आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SC खटले वाटप: सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेतील खंडपीठ म्हणाले- चीफ जस्टीस सर्वकाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नंतरचे ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन बी. लोकूर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. - Divya Marathi
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नंतरचे ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन बी. लोकूर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.

नवी दिल्ली - कोर्टात केसेस वाटपासंबंधी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याची मागणी करणारी याचिक सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळताना कोर्ट म्हणाले, सरन्यायाधीश हे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख आहेत. खटल्यांचे वाटप किंवा खंडपीठांची स्थापना हे सरन्यायाधीशांचे घटनात्मक अधिकार आहेत. सरन्यायाधीशांच्या कामकाजावर अविश्वास दाखवता येऊ शकत नाही, असेही कोर्ट म्हणाले. 

 

12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश इतिहासात प्रथमच माध्यमांसमोर आले होते. त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. 
- चीफ जस्टीस ऑफ इंडिया (सीजेआय) यांना लिहिलेल्या 7 पानी पत्रातमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टातील कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. 
- त्यानंतर वकील अशोक पांडे यांनी ही याचिका दाखल केली होती, ती सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळली आहे. 

 

सरन्यायाधीशांच्या कामकाजावर अविश्वास नाही.. 
- जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले, की सीजेआय हे उच्च संवैधानिक पदाधिकारी आहेत. संविधानानुसार सुप्रीम कोर्टाची कार्यवाही चालावी यासाठी सीजेआय यांच्या कामकाजावर अविश्वास दाखवता येऊ शकत नाही. 

 

जानेवारीमध्ये 4 न्यायाधीशांनी घेतली होती पत्रकार परिषद 
- 12 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नंतरचे ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन बी. लोकूर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. 
- पत्रकार परिषदेमध्ये जस्टिस जे. चेलमेश्वर यांनी जस्टीस दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, 'लोकशाही धोक्यात आहे', असे म्हटले होते. त्यांनी आरोप केला होता, की चीफ जस्टिस आपल्या पसंतीच्या खंडपीठाकडे केसेस सोपवतात. 
- सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेण्याची ही पहिली घटना होती. 

बातम्या आणखी आहेत...