आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - पीएनबी फ्रॉड प्रकरणामध्ये काँग्रेसने शुक्रवारीही सरकारवर प्रश्न उपस्थित केले. पार्टीचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रेस कॉन्फरन्सदरम्यान सांगितले की, नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांना दिलेल्या LoU मध्ये फक्त 11400 कोटींचे नुकसान झाले नाही तर हा घोटाळा तब्बल 30 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर सुरजेवाला यांनी सरकारवर आरोप केला की पीएमओ, ईडी, फ्रॉड इनव्हेस्टीगेशन ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस मिनिस्ट्रीकडे 7 मे 2015 पासूनच या घोटाळ्याविषयी माहिती होती. तरीही 31 जानेवारी 2017 पर्यंत घोटाळा करणाऱ्यांच्या विरोधात काहीही कारवाई करण्यात आली नाही. पीएनबीने बँकिंग इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. हा घोटाळा 177.17 कोटी डॉलर म्हणजे 11,356 कोटींचा आहे.
कांग्रेसचे आरोप
1) 30 हजार कोटींचा घोटाळा
- सुरजेवाला म्हणाले, 11400 कोटींचे नुकसान झाल्ययाचे बँकांनी मान्य केले आहे. त्याशिवाय बँकांकडून 4 इतर कंपन्यांना कर्ज दिले आहे. ते 9906 कोटींच्या आसपास आहे. 24 तासांत घोटाळा 21 हजार कोटींवर पोहोचला आहे. पीएनबीचे 57 टक्के शेयर भारत सरकारकडे आहेत. इतर सामान्य लोकांकडे आणि आर्थिक संस्थांकडे आहेत. पीएनबीच्या शेअर्समध्ये 7 हजार कोटींची व्हॅल्यू संपली आहे. हे नुकसानही देशाच्या जनतेचेच आहे. ते 7 हजार कोटी जोडले तर घोटाळा 28 हजार कोटींच्या आसपास पोहोचतो. त्याशिवाय नीरव मोदीशी संबंधित तीन कंपन्यांच्या व्यवहारांबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते हा आकडा 3 ते 5 हजार कोटींपर्यंत असू शकतो. त्यामुळे हे नुकसान 30 हजार कोटींपर्यंत पोहोचू शकते.
2) Udaan चा नवा अर्थ, घोटाळेबाज देशाबाहेर
सुरजेवाला म्हणाले, मोदी सरकारचा buzz वर्ड Udaan होता. आता त्याचे अर्थ बदलले आहेत. त्याचा अर्थ every scamster can flee & fly undetected & unchecked.. म्हणजे कोणताही घोटाळेबाज कोणतीही चेकिंग न होता देशाबाहेर जाऊ शकतो.
3) गुरुवारी विचारले चार प्रश्न
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गुरुवारी ट्वीट केले होते. त्यात त्यांनी नीरव मोदीला आधी मिठी मारली नंतर ते दावोसला गेले आणि देशाचे 12 हजार कोटी लुटले. नीरव, माल्यांप्रमाणेच देशाबाहेर पळून गेले. तर सरकार वाट पाहत राहिले. #From1MODI2another"
गुरुवारीच सुरजेवाला यांनी 4 प्रश्न विचारले होते...
1. नीरव मोदी कोण आहे? हा नवा #मोदीस्कॅम आहे का?
2. नीरव मोदीला ललित मोदी आणि विजय माल्याप्रमाणे देशाबाहेर जाण्यासाठी सरकारने अंतर्गत मदत केली का?
3. जनतेचा पैसा घेऊन पळून जायचे हा नियम बनला आहे का?
4. 26 जुलै 2016 ला याबाबत समजल्यानंतर पंतप्रधानांनी कारवाई का केली नाही?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.