आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले, काश्मीरची अवस्था अत्यंत वाईट : मनमोहनसिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी एनडीए सरकारवर देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केल्याचा आरोप केला आहे. मनमोहनसिंग इंदिरा गांधी स्टेडिअम मध्ये सुरु असलेल्या कांग्रेसच्या 84व्या महाअधिवेशनात बोलत होते. ते म्हणाले, सरकारने नोटबंदीसारखे चुकीचे निर्णय घेतले तसेच जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले की ही कर प्रणाली चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली. यावेळी कांग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी, सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खडगे आणि पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. 

 

नोटंबदीने लहान व्यावसायिकांचे नुकसान 

-मनमोहनसिंग म्हणाले, भाजपा सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट करुन ठेवली आहे.

-नोटबंदीचा निर्णय हा विचारपूर्वक घेतला गेला नाही.तसंच जीएसटी देखील चुकीच्या पद्धतीने लागू केला गेला. त्यामुळे लहान उद्योग लयाला गेले.

-काश्मीरमध्ये वाढलेल्या दशहतीवासाठी एनडीए सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरवले. मनमोहनसिंग म्हणाले, सरकारने जम्मू-काश्मीरचा प्रश्न अत्यंत वाईट पद्धतीने हाताळला.    राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे.

-शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासंबंधी सिंग यांनी मोदी सरकारवर टिका केली ते म्हणाले मोदी म्हणतात की 6 वर्षात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करु पण ते जो पर्यंत हे सिद्ध करुन दाखवत नाहीत तो पर्यंत एखाद्या जुमल्यासारखेच वाटेल.


काँग्रेसने लोकांसाठी एेतिहासिक योजना आणल्या : सोनिया गांधी 

-सोनिया गांधी महाअधिवेशनात बोलताना सांगितले, काँग्रेस ने देशतील लोकांच्या सशक्तीकरणासाठी एेतिहासिक योजना लागू केल्या.

-यामध्ये नरेगा, वन अधिकार, भूमि अधिग्रहण, शिक्षण आणि आरोग्य, भोजन अधिकार आणि माहिती अधिकार आदी कायद्यांमुळे करोडो लोकांचे आयुष्य बदलले.

-मोदी सरकार याच योजनांना कुमकुवत करण्याचे काम करत आहे हे पाहून दु:ख वाटते. त्या पुढे म्हणाल्या, मागील चार वर्षात कांग्रेसचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी अहंकार आणि सत्तेच्या नशेत त्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही.

-साम-दाम-दंड-भेद सगळ्यांचा वापर केला जात आहे. पण कांग्रेस कधीही सत्तेपुढे झुकली नाही व झुकणार नाही.

-मोदी सरकारची हुकुमशाही, संसदेचा अनादर आणि विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे तसेच मीडियावर दबाव टाकणे आदींचा कांग्रेसने विरोध केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...