आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचा तिढा सुटला! उपराज्यपालांनी केजरींना सांगितले, तातडीने अधिकाऱ्यांची भेट घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली सरकारचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बेबनावामुळे निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सचिवालयात जाऊन अधिकाऱ्यांना तातडीने भेटावे आणि चर्चेतून तिढा सोडवावा असे सांगितले आहे. अरविंद केजरीवालांसह गोपाल राय, मनीष शिसोदिया आणि सत्येंद्र जैन आठ दिवसांपासून राजभवनामध्ये अधिकाऱ्यांच्या असहकाराविरोधात आंदोलन करत आहेत. 


राज्यपालांच्या आदेशाननंतर अरविंद केजरीवाल लवकरच अधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंत्र्यांबरोबर बैठका सुरू केल्या असल्याची माहिती आहे. अशा काही बैठका झाल्या असल्याचीही माहिती मिळत आहे. केजरीवाल यांनी आज सकाळी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना हा तिढा सोडवण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्यपालांनी आज हे पाऊल उचलले असल्याचे समोर येतेय. पण केजरीवाल धरणे सोडून जाणार का हे अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. दरम्यान आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने चर्चेसाठी वाट पाहत असल्याचे पत्राद्वारे म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...