आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाती मदन दिल्ली क्राइम ब्रँच ऑफिसमध्ये पोहोचला, बलात्कार प्रकरणी सुरू आहे चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शिष्येबरोबर बलात्कार प्रकरणात अडकलेला दाती मदन महाराज मंगळवारी दिल्लीच्या पोलिस क्राइम ब्रँच ऑफिसमध्ये पोहोचला. सध्या पोलिस त्याची विचारपूस करत आहेत. क्राइम ब्रँचकडून दाती मदन आणि 4 इतर आरोपींना सादर होण्यासाठी बुधवारपर्यंतचे अल्टीमेटम देण्याच आले होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या टीमने त्याच्या दिल्ली आणि राजस्थानातील पाली आश्रमावर छापा मारला होता. 


गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक (गुन्हे शाखा) जसवीर सिंह मलिक यांनी सोमवारी म्हटले होते की, जर दाती आणि इतर आरोपी हजर झाले नाही, तर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते. दुसरीकडे दाती या प्रकरणात अंतरिम जामीन मिळवून वाचण्याच्या प्रयत्नात होता. एका तरुणीने दिल्लीच्या फतेहपुरी बेरी ठाण्यात दाती मदनवर अत्याचाराचा आरोप लावत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तपास दिल्ली क्राइम ब्रँचकडे सोपवला आहे. 


भितीपोटी पीडितेने दोन वर्षे तक्रार केली नाही 
तरुणीने तक्रारीत म्हटले की, शनिधाममध्ये दोन वर्षांपूर्वी दातीने तिचे लैंगिक शोषण केले होते. समाजात बदनामी आणि भितीमुळे त्यांनी आधी तक्रार केली नाही. पोलिसांनी दाती महाराजवर 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक संबंध), 354 (छेडछाड) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दाती मदन शनिधामचा संस्थापक आहे. त्याचा जन्म 10 जुलै 1950 ला अलवर (राजस्थान) मध्ये झाला. 7 वर्षांचा असताच तो संत बनला होता. 

बातम्या आणखी आहेत...