आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती तर माझ्या मुलीसारखी..असा विचारही करू शकत नाही!', चौकशीत म्हणाला दाती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- दाती महाराज चौकशीसाठी त्याच्या पारंपरिक वेशभूषेमध्येच पोहोचला

- कोर्टाने 21 जूनपर्यंतचा रिपोर्ट मागितला तर पोलिसांनी मंगळवारीच बोलावले 
- फरार झालेला दाती अचानक उपस्थित झाला, पोलिसांनी 7 तास चौकशीनंतर सोडले 


नवी दिल्ली - शिष्येवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दाती मदन मंगळवारी पोलिस क्राइम ब्रँचसमोर हजर झाला. सुमारे 7 तास पोलिसांनी त्याची चौकशी केली. याठिकाणी बाबाला 100 हून अधिक प्रश्न विचारले. यादरम्यान दाती कधी हसताना तर कधी तणावात उत्तरे देत होता. आरोप करणारी तरुणी माझ्या मुलीसारखी आहे. मी असा विचारही करू शकत नाही असे दाती म्हणाला. मुलगी केवळ कटातील मोहरा असल्याचे दाती म्हणाला. पोलिसांचे मात्र त्याच्या उत्तरांनी समाधान झाले नसल्याचे दिसले. शुक्रवारी त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. 


दातीने पोलिसांच्या प्रश्नांना अशी उत्तरे दिली... 

Q. तुम्ही 25 वर्षीय पीडितेला कसे ओळखता?
A. ती 10 वर्षांपूर्वी राजस्थानच्या पालीमधील आलावास येथील गुरुकुलमध्ये राहण्यास आली होती. 

Q. तरुणीने तुमच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे?
A. अगदी खोटे आरोप आहेत. माझ्या विरोधात हा कट आहे, त्यात या मुलीला मोहरा बनवले आहे. 

Q. तुमच्या विरोधात कट करणारे कोण आहेत?
A. माझ्या पुढे जाण्याचे जे लोक आनंगदी नाहीत ते. 

Q. तरुणी म्हणाले तुम्ही आणि तुमच्या भावांनी राजस्थान आणि दिल्लीतील शनि धाम येथे तिच्यार बलात्कार आणि अत्याचार केले?
A. मला याचे आश्चर्य आहे की, जिला मी माझ्या मुलीचा दर्जा दिला तीच आज मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 

Q. तुम्ही काही केले नाही तर तपासापासून दूर का पळत होते? 
A. मी कधीही तपासापासून दूर गेलो नाही. कायद्यावर मला विश्वास आहे. आरोप लागल्यानंतर पहिल्याच दिवशी मी तपासात पूर्ण सहकार्य केले. पण काही कामे अशी होती, जी मला आधी पूर्ण करायची होती. 

Q. ती कामे नेमकी काय होती?
A. ते मी सांगू शकणार नाही.

Q. पीडितेने आरोप लावल्यानंतर तुम्ही तिला जीवे मारण्याची धमकीही दिली?
A. नाही असे काही नाही. कोणाच्या तरी दबाबात ती असे बोलतेय. जर आरोप खरे असते तर दोन वर्षांपूर्वीच समोर आले असते. 

Q. तुम्ही तरुणीशी फोनवर बोलायचे?
A. नाही. 

(अशा जवळपास 90 प्रश्नांची उत्तरे दातीला द्यावी लागली.)

बातम्या आणखी आहेत...