आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची चिंता: डिजिटल इंडियाच्या प्रचारावर सुरक्षेपेक्षा 10 पट जास्त खर्च

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रालय स्तरावर  तयारी सुरू केली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय (आयटी)ने डिजिटल इंडियाच्या प्रचार-प्रसारासाठी जास्त भर दिला आहे. २०१८-१९ मध्ये माहिती तंत्रज्ञान खाते प्रचार-प्रसारावर १५१० कोटींची तरतूद केली आहे. 


मंत्रालयास मंजूर झालेल्या निधीच्या एक चतुर्थांश इतकी रक्कम यावर खर्च होणार आहे, तर सायबर सुरक्षेसंबंधातल्या प्रकल्पावर फक्त १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रचार-प्रसारासाठी जितकी रक्कम मागितली होती, त्यापेक्षा जास्त निधीसाठी केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे, तर डिजिटल इंडियाकडून राबवण्यात येणाऱ्या अन्य योजनांसाठी कमी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. समितीच्या अहवालात डिजिटल इंडियाच्या चित्राची दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. 


यानुसार,  देशात डेबिट-क्रेडिट कार्डाच्या घोटाळ्यात वाढ होत असताना सायबर सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या निधीपेक्षा कमी रक्कम मंजूर झाली आहे. आरबीआयच्या अहवालानुसार २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये डेबिट-क्रेडिट कार्डात फसवणुकीच्या प्रकरणात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गेल्या पाच वर्षांत यासंबंधीच्या गुन्ह्यात पाच पट वाढही झाली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा,  डिजिटल इंडिया; मागणीपैकी 70 % रक्कम मंजूर... 

बातम्या आणखी आहेत...