आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- अण्णाद्रमुक व टीअारएसच्या गोंधळामुळे लोकसभेत सोमवारी दुसऱ्या दिवशीही मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावांवर विचार केला जाऊ शकला नाही. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसने हे प्रस्ताव आणलेले आहेत. प्रचंड गदारोळात गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सरकार अविश्वास प्रस्तावासह सर्व मुद्द्यांवर चर्चेस तयार आहे. त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तथापि, हौद्यात उभ्या असलेल्या अण्णाद्रमुक व टीआरएस खासदारांनी आणखीच जोरात घोषणाबाजी सुरू केली. वारंवार विनंती करूनही खासदार आपापल्या जागांवर न परल्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब केले. त्या म्हणाल्या, अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यासाठी समर्थन करणाऱ्या खासदारांची गणती गरजेची आहे. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू नसल्यामुळे गणती शक्य नाही.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सलग ११ व्या दिवशी लोकसभा आणि राज्यभेत कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. सकाळी कामकाज सुरू झाल्याच्या पाचच मिनिटांत राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
लोकसभा आणि १२ वाजेपर्यंत नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. शुक्रवारीही गदारोळामुळे अविश्वास प्रस्तावांवर विचार हाेऊ शकला नाही. टीडीपीचा आराेप आहे की, सरकार जाणूनबुजून गदाराेळ करवत आहे.
वायएसआरकडून तिसऱ्यांदा अविश्वास प्रस्तावाची नोटीस : लोकसभा स्थगित झाल्यानंतर सोमवारी वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांनी लोकसभेच्या सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची तिसरी नोटीस सोपवली. तो मंगळवारी सादर केला जाऊ शकतो. सुब्बारेड्डी म्हणाले, अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत आम्ही नोटीस देत राहू. त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या स्नेहभोजनावर बहिष्काराचीही घोषणा केली.
असे कधीपर्यंत चालायचे?
लोक हसत आहेत. संसदेत तुमची वर्तणूक थट्टेचा विषय होईल. हे देश आणि संसदेच्या हिताचे नाही. असे कधीपर्यंत चालायचे? लोक आमची निंदानालस्ती करू लागले आहेत. सरकार चर्चेसाठी तयार आहे तर अडचण कशाची आहे?
- एम. व्यंकय्या नायडू, सभापती, राज्यसभा
चंद्राबाबू म्हणाले, भाजप माझा आवाज दाबू पाहत आहे
भाजप माझा आवाज दाबू पाहत असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आराेप केला. ते म्हणाले, ‘मी राज्याच्या हक्कांसाठी लढत आहे. मात्र भाजप काही लोकांना माझ्यावर आरोप करण्यासाठी चिथावणी देत आहे.’ त्यांचा इशारा वायएसआरचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि जनसेनाचे प्रमुख पवन कल्याण यांच्याकडे होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.