आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार, खेळांवरील सट्टा वैध केल्यास करांमधून महसूल; सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर विधी आयोगाचा अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात सुरू असलेला जुगार आणि क्रिकेटसहित सर्व खेळांवरील सट्टेबाजी वैध करण्याची शिफारस विधी आयोगाने केली. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना गुरुवारी अहवाल सोपवण्यात आला. 


सट्टेबाजी वैध करून सरकारने यावर कर वसूल करायला हवा, असे आयोगाने सुचवले आहे. जुगार किंवा सट्टेबाजी करणाऱ्यांचे आधार किंवा पॅन कार्ड लिंक करण्याची शिफारसही करण्यात आली. मनी लाँड्रिंगसारखे बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी यात केवळ कॅशलेस व्यवहाराची परवानगी द्यायला हवी. कॅसिनो आणि ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीत परदेशी गुंतवणुकीचे दरवाजे उघडण्यासाठी आयोगाने फॉरेक्स आणि एफडीआय धोरणाचे नियमन करणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. आयोगाच्या मते, जे राज्य कॅसिनो सुरू करण्याची परवानगी देतील त्या राज्यांत परदेशी गुंतवणुकीला यामुळे चालना मिळेल. शिवाय पर्यटन आणि आदरातिथ्याच्या क्षेत्रातही वाढ होईल. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानेही २०१६ मध्ये क्रिकेटमधील सट्टेबाजीला वैध करण्याच्या मुद्द्यावर तपास करण्यास विधी आयोगाला म्हटले होते. 

बातम्या आणखी आहेत...