आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दोन वर्षात 6,778 चौकिमी वनक्षेत्र वाढले, भारत जगात प्रमुख 10 मध्ये सामील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात दोन वर्षात ६,७७८ चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र वाढले आहे. एकूण वनक्षेत्रात भारत आता जगाच्या प्रमुख १० देशात सामील झाला आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील वनांची स्थिती दर्शवणारा २०१७ चा द्विवार्षिक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, २०१५ मध्ये देशात एकूण वनक्षेत्र ७.०१ लाख चौकिमी होते. २०१७ मध्ये यात वाढ झाली असून एकूण वनक्षेत्र ७.०८ लाख चौकिमी झाले आहे. हे क्षेत्र देशाच्या एकूण भूभागाच्या २१.५४ टक्के आहे. परंतु वनक्षेत्राच्या वाढीचा दर अजूनही केवळ १ टक्के इतकाच आहे.  


या दोन वर्षात म्हणजेच २०१५ ते २०१७ च्या दरम्यान देशात १ हेक्टरपेक्षा कमी परिसरातील वनात १,२४३ वर्ग किमीची वाढ झाली आहे. सध्या हे जंगल ९३,८१५ चौकिमीपर्यंत पसरले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिसा आणि तेलंगणमध्ये या दोन वर्षात सर्वाधिक वनक्षेत्र वाढले आहे. मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालयात मात्र वनक्षेत्र घटले. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७७,४१४ चौकिमीवर वनक्षेत्र आहे.  ६६,९६४ चौकिमी क्षेत्रासह अरुणाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर छत्तीसगडमध्ये ५५,५४७ चौकिमी वनक्षेत्र आहे. अहवालाचे प्रकाशन करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, संयुक्त वन व्यवस्थापनासारख्या वन संरक्षण धोरणांमुळे देशातील हरित क्षेत्रात वाढ झाली आहे. वनांच्या क्षेत्रफळाचा विचार करता आता आपण जगात प्रमुख १० देशात सामील झालो आहोत.  भारतात लोकसंख्येची घनता प्रतिचौकिमीवर ३८२ व्यक्ती असून प्रमुख ९ देशांमध्ये मात्र हा आकडा १५० व्यक्ती असा आहे. 

 

देशातील १५ राज्यांत ३३% पेक्षा जास्त क्षेत्रावर वने

- दोन वर्षानंतर प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालासाठी देशातील १८ हजार स्थानांवर सर्वेक्षण करण्यात आले.  
- देशातील १५ राज्यांत ३३% पेक्षा जास्त क्षेत्रावर वने आहेत. यात ७ राज्यात ७५% पेक्षा जास्त क्षेत्रावन वने.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी माहिती...

बातम्या आणखी आहेत...