आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Four Years Of The Country, The Country Has Won 70 Years Of Prestige: Rahul

माेदींनी चार वर्षांत देशाची ७० वर्षांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली : राहुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी साेमवारी दिल्लीत ‘संविधान बचाअाे’ अभियानास प्रारंभ केला. या वेळी त्यांनी सर्वाेच्च न्यायालय व घटनात्मक संस्थांचे अस्तित्व संपवण्याचा कट रचल्याचा अाराेप माेदी सरकारवर केला.  


राहुल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना केवळ ‘माेदी’ नावातच स्वारस्य असून ते फक्त स्वत:ची ‘मन की बात’ एेकतात. देशात दलितांसह महिलांवर अत्याचार हाेत असूनही पंतप्रधानांनी चुप्पी साधली अाहे. निवडणुकीत माेदी यांनी दाेन काेटी तरुणांना राेजगार, बेटी बचाअाे-बेटी पढाअाे अादी मुद्द्यांवरून नागरिकांची दिशाभूल केली; परंतु अाता मुलींना शिकवण्याएेवजी वाचवावे लागत अाहे, तेदेखील भाजप नेत्यांपासून, असेही ते म्हणाले.

 

संविधान ही काँग्रेस व डाॅ. अांबेडकरांची देण  
देशाला काँग्रेस पक्ष व डाॅ. भीमराव अांबेडकरांनीच संविधान दिले अाहे. निवडणूक अायाेग, लाेकसभा, राज्यसभा, विधानसभा, अायअायटी, अायअायएम यासारख्या संस्थाही अामच्या संविधानाने दिल्या अाहेत. संविधानाशिवाय काहीही हाेऊ शकत नव्हते. सर्वाेच्च व उच्च न्यायालय हा संविधानाचा पाया अाहे, असेही ते म्हणाले.  

 

माझ्या १५ मिनिटांच्या भाषणानेच माेदी पळतील  
राहुल गांधी म्हणाले की, मला केवळ १५ मिनिटेच संसदेत बाेलू द्या. राफेल व नीरववर चर्चा करेल व माेदी तेथे उभेही राहू शकणार नाहीत. नीरव माेदी ३० हजार काेटी रुपये घेऊन पळून गेला. यावर ते एक शब्दही बाेलले नाहीत. प्रथमच सरकारने संसदेला राेखले अन;् लाेक म्हणतात की, विराेधी पक्ष संसदेचे कामकाज चालू देत नाहीत.  

 

घराणेशाही वाचवण्यासाठीच काँग्रेसचे अांदाेलन : शहा  
राहुल गांधी यांच्या अाराेपांवर बाेलताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, काँग्रेस लाेकशाहीएेवजी घराणेशाही कायम ठेवण्यासाठीच संविधानाची भावना संपवण्याचे काम करत अाहे. त्यासाठी राहुल हे बनावट अभियान राबवत अाहेत.

 

  

बातम्या आणखी आहेत...