आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्यांत पकडले गेले 75 कोटी कॉम्प्युटर व्हायरस, व्हायरसमधूनही डेटा लीक होतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फेसबुक, ट्विटरद्वारे डेटा लीक होत असल्याच्या बातम्या सुरू असतानाच एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. व्हायरसवर संशोधन करणाऱ्या द इंडिपेंडंट आयटी सिक्युरिटी इन्स्टिट्यूट वेबसाइटनुसार २०१८ मध्ये आतापर्यंत ७५ कोटी व्हायरस पकडले गेले आहेत. त्यापैकी ४० कोटी अगदी नवे व्हायरस आहेत. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये फक्त ३२ कोटी व्हायरस होते. त्यापैकी फक्त १४ कोटी नवे व्हायरस होते. म्हणजे पाच वर्षांत कॉम्प्युटर व्हायरसची संख्या सुमारे अडीच पट वाढली आहे.  


दुसरीकडे गुगलच्याच व्हायरसशी संबंधित व्हायरस टोटल या वेबसाइटनुसार सध्या फक्त ५६ अँटी व्हायरस आहेत. ते सध्याच्या व्हायरसपैकी सुमारे ४० टक्के व्हायरसच शोधू शकतात आणि त्यांना हटवू शकतात. उर्वरित ६० टक्के व्हायरस सध्याच्या अँटिव्हायरसच्या रडारपासून दूर आहेत. टोटल वेबसाइटनुसार मागील आठवड्यात १२ लाख ८१ हजार व्हायरसशी संबंधित प्रकरणे या वेबसाइटच्या लोकांनी पाठवली, त्यापैकी फक्त ५ लाख १५ हजार ४७० व्हायरसला सध्याचे ५६ अँटिव्हायरस पकडू शकले. उर्वरित सुमारे आठ लाख व्हायरस अँटिव्हायरसच्या पकडीपासून दूर आहेत. तज्ज्ञांच्या मते, हेच ६० टक्के व्हायरस सर्व अँटिव्हायरसला चकमा देत डेस्कटॉप, लॅपटॉप आणि स्मार्टफोनमधून डेटा चोरी करतात. याबाबत लोकांमध्ये जागरूकता कमी असल्याने एक टक्का लोकांनाच आपला डेटा लीक व्हायरसमुळे झाल्याचे समजते. तज्ज्ञांच्या मते इंटरनेटचे प्रकरण ग्लोबल असते त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणे एका देशापर्यंत सीमित ठेवली जाऊ शकत नाहीत.  


डेटा लीकवर मास्टरिंग मेटास्प्लॉट, मेटोप्लॉइट बूट कॅम्प यांसारखी पुस्तके लिहिलेले आंतरराष्ट्रीय लेखक निपुण जसवाल यांनी सांगितले की, व्हायरस आणि अँटिव्हायरसचे काम एका अर्थाने चोर-शिपायासारखे आहे. नवा अँटिव्हायरस तयार होईपर्यंत कुठला ना कुठला नवा कॉम्प्युटेक व्हायरस मालवेअर, मॉलिक्युलस किंवा रॅन्समवेअर तयार केला जातो. हा व्हायरस थेट स्मार्टफोनला प्रभावित करताे हीच भारतातील चिंतेची बाब आहे. ते डेटा चोरी करतात. आपल्या मोबाइलचा डेटा चोरीस जात आहे हे एक टक्क्यापेक्षाही कमी लोकांना समजते. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सर्ट इन) या संस्थेचे महासंचालक संजय भल यांनी सांगितले की. भारत सरकारने या व्हायरसला तोंड देण्यासाठी सायबर स्वच्छता केंद्र तयार केले आहे. तेथे अनेक अँटिव्हायरस आपल्या कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनमध्ये मोफत डाऊनलोड करू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...