आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्‍या विजयाचे 4 शिल्पकार: 36 वर्षांपासून खाते नसताना शून्‍यापासून शिखरापर्यंत पोहोचवल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1) सुनील देवधर (वय : ५२ वर्षे, शिक्षण-एमएस्सी, मूळ- महाराष्ट्र) - Divya Marathi
1) सुनील देवधर (वय : ५२ वर्षे, शिक्षण-एमएस्सी, मूळ- महाराष्ट्र)

ज्या त्रिपुरात भाजपचा एकही आमदार नव्हता. आमदार तर सोडाच, आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये पोलिंग एजंटही मिळत नसे अशा त्रिपुरात केवळ तीन वर्षांत भाजपची पाळेमुळे रुजवून पहिल्याच प्रयत्नात कट्टर डाव्यांची आणि क्लीन इमेज असलेल्या माणिक सरकार यांची २५ वर्षांची सत्ता उलटवून  चक्क सत्ता प्राप्त करण्याचे शिवधनुष्य भाजपने पेलले. एकही आमदार नसलेला पक्ष निवडणुकीनंतर थेट सत्तेवर आणण्याचा चमत्कार यापूर्वी एन. टी. रामाराव यांनी करून दाखवला होता. त्यानंतर आता त्रिपुरात भाजप सत्तेवर आणण्याचा पराक्रम महाराष्ट्रातून त्रिपुराचा गड ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या सुनील देवधर आणि त्यांच्या टीमने करून दाखवला आहे. आणि याला कारणीभूत आहे सुनील देवधर यांची रणनीती. वन बूथ टेन यूथ ही आमची योजना यशस्वी झाल्याचे स्वतः सुनील देवधर सांगतात.

 

त्रिपुरा हा डाव्यांचा गड असल्याने तेथे अन्य कोणत्याही पक्षाला, विशेषतः भाजपला प्रवेश करणे कठीणच झाले होते. रा.स्व. संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याने संघ आणि भाजप तसा पिछाडीवरच होता. ग्रामीण भागात तर भाजपचे नामोनिशाणही नव्हते. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त १.५४ टक्के मते पडली होती. लोकसभेच्या वेळेसही दोन्ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. अशा स्थितीत त्रिपुरात सत्ता प्राप्त करणे सोपे नव्हते. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सुनील देवधर यांच्यावर त्रिपुराची जबाबदारी सोपवल्यानंतर ते महिन्यातून १५ दिवस त्रिपुरात जात. संपूर्ण त्रिपुरा त्यांनी पिंजून काढला. दिवसाचे आठ आठ तास राज्याच्या दुर्गम भागात सुनील देवधर फिरले.


संघटन नसल्याने त्रिपुरात कार्यकर्त्यांची फळी नव्हती. ती फळी सुनील देवधर यांनी तयार केली. यात शिवानंद नाडकर्णी, करमरकर आदी मराठी तरुणांचा समावेश आहे. सर्वप्रथम त्यांनी वन बूथ टेन यूथ ही योजना राबवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत विरोधी पक्षाचा पोलिंग एजंट नसल्याने बोगस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर होत असे. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम यावर लक्ष देण्यात आले. त्याचा भाजपला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. तसेच संघटनेतही त्यांनी बदल केले आणि विप्लव देब या तरुणाला प्रदेशाध्यक्षपदी बसवले.


आणखी एक महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वच्छ चारित्र्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी माणिक सरकारने गेल्या २५ वर्षांत राज्याला कसे खड्ड्यात घातले हे जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश आले. डाव्यांना सुनील देवधर म्हणजे सत्ताप्राप्तीतील मोठा अडसर असल्याचे जाणवले आणि ते प्रचारसभांमध्ये महाराष्ट्र से सूबेदार भेजा है असा उल्लेख सुनील देवधर यांचा करू लागले. यावरूनच सुनील देवधर यांनी त्रिपुरात डाव्यांना कसे कडवे आव्हान उभे केले होते ते दिसून आले.

 

- गुजरातेत व्यवस्थापन, मोदी घेऊन गेले वाराणसीत

ईशान्येकडील विधानसभा निवडणुकीची धुरा सुनील देवधर यांच्याकडे होती. त्यांच्या रणनीतिच्या जोरावर भाजपने त्रिपुरात लाल गडाला सुरूंग लावला. देवधर शिक्षणानंतर १९९१ मध्ये संघ प्रचारक बनले. ८ वर्षे मेघालयात होते. येथील स्थानिक खासी व इतर भाषा अवगत केल्या २०१२ मध्ये गुजरातच्या निवडणुकीत दाहोदचा प्रभार मिळाला. पुढे वाराणसी मतदारसंघाची जबाबदारी. महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी त्रिपुराचे प्रभारी होत कम्युनिस्ट मुक्त भारताची जबाबदारी घेतली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर 3 शिल्‍पकारांविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...