आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - वयाच्या 21 व्या वर्षी IAS एक्झाममध्ये सुयश मिळवणारे शेख अन्सार अहमद यांनी पहिल्याच प्रयत्नात एक्झाम क्लिअर केली होती. ऑल इंडिया लेव्हलवर त्यांना 361वी रॅंक मिळाली होती. यानंतर देशभरात IAS एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेख अन्सार प्रेरणा बनलेले आहेत. त्यांना मुलाखतीत जे प्रश्न विचारण्यात आले होते, त्यांनी ते विविध भाषणांमधून शेअर केले आहेत.
> आम्ही त्यांना विचारण्यात आलेले काही प्रश्न येथे सांगत आहोत. सोबत विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी इतर प्रश्नोत्तरेही येथे शेअर करत आहोत. कौटिल्य अकॅडमीचे डायरेक्टर आश्रेंद्र मिश्रा सांगतात की, यावरून IAS एक्जामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळेल की मुलाखतीत कसे ट्रिकी प्रश्न येतात. यामुळे ते स्वत:हून चांगल्या रीतीने मुलाखतीची तयारी करू शकतील. UPSCच्या जूनमध्ये होणाऱ्या एक्झामसाठी DivyaMarathi.Com एक सिरीज चालवत आहे. यात आम्ही IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगत आहोत. हे प्रश्न तज्ज्ञांनी आणि उमेदवाराने आपल्या विविध इंटरव्यूजमध्ये शेअर केलेले आहेत.
केव्हा आहे यूपीएससीची एक्झाम...
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने सिव्हिल सर्व्हिस प्रारंभिक परीक्षा-2018 चे शेड्यूल जारी केलेले आहे. एक्झाम 3 जून 2018 रोजी होईल. यासाठी अर्ज प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून अव्हेलेबल होईल. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा द्यायची आहे, त्यांचे ग्रॅज्युएशन कम्पिलट असणे आवश्यक आहे. असे स्टुडेंट्स जे फायनल इयरमध्ये आहेत आणि रिझल्टची वाट पाहत आहेत, तेही यात सहभागी होऊ शकतात.
तीन टप्प्यांत होते परीक्षा...
ही परीक्षा 3 टप्प्यांत होते. उमेदवाराला सर्वात आधी प्रारंभिक परीक्षा द्यावी लागेल. यात यश मिळाल्यावर ते मेन एक्झामसाठी सिलेक्ट होतील. क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये सेट होतील. प्रत्येक प्रश्नपत्र सोडवण्यासाठी उमेवाराला 2 तासांचा वेळ मिळेल.
IAS होण्याचा केला निश्चय...
21 वर्षांच्या अ्न्सार अहमद शेखने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत 361वी रँक मिळवली. अन्सारचे वडील मराठवाड्यातील जालना शहरात ऑटो रिक्षा चालवायचे. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. काही वर्षांपूर्वी अन्सार शेखच्या वडिलांना सरकारी आवास योजनेअंतर्गत घर मिळवण्यासाठी अधिकाऱ्याने लाच मागितली होती. हीच गोष्ट शेख अन्सारला खटकली आणि त्याने आयएएस अधिकारी बनण्याचा निश्चय केला.
छोट्या भावाने काम करून शिक्षणाचा उचलला खर्च
शेख अन्सार यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दोन्ही बहिणींची लग्ने झाली आहेत, तर छोटा भाऊ शेख अनीस हा सिपोरा बाजार येथे एका दुकानात काम करतो. त्यास पाच हजार रुपये पगार आहे. पाच हजार रुपयांतील एक रुपयाही खर्च न करता पूर्ण पाच हजार रुपये तो भावाच्या शिक्षणासाठी पाठवत असे. घरातील प्रत्येक सदस्याने त्याच्या शिक्षणाची काळजी घेतली, आणि अन्सारनेही त्यांच्या कष्टाला यशाची झालर दिली.
मुस्लिम युथ ISIS जॉइन करताना का दिसतात? यामागे काय कारण आहे? पाहा पुढच्या स्लाइड्सवर... (सोबत विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी इतर प्रश्नोत्तरेही येथे शेअर करत आहोत. )
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.