आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविवाहित मृत मुलाच्या वीर्यापासून आईने मिळवली जुळी नातवंडे; पुण्यात वैद्यकीय ‘प्रयाेग’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अविवाहित मुलगा प्रथमेश पाटील ऐन तारुण्यात सत्ताविसाव्या वर्षी ब्रेन ट्यूमरने गेला. मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी या तरूणाचे वीर्य गोठवून ठेवले होते. त्याची अाई राजश्री यांंनी उसने गर्भाशय मिळवत (सरोगसी) या वीर्यापासून जुळी नातवंडे मिळवली. यात एक मुलगा व एक मुलगी अाहे. त्यापैकी मुलाचे नाव प्रथमेश तर मुलीचे नाव प्रीशा ठेवण्यात अाले. हा अनाेखा प्रकार सोमवारी पुण्यात घडला.


‘क्रायोप्रिझर्वेशन’ - आशा पुनर्जन्माची

केवळ वीर्य किंवा शरीरपेशी नव्हे तर मृत्यूनंतर स्वतःचे संपूर्ण शरीरच जतन करण्यासाठी ‘क्रायोप्रिझर्वेशन’चा उपयोग करण्याची टूम सध्या पाश्चात्त्य देशांमधल्या धनाढ्यांमध्ये रुढ होऊ लागली आहे. भविष्यात विज्ञानाची प्रगती एवढी होईल की कदाचित मृत शरीर जिवंत करणे शक्य होईल, या आशेपोटी निधनानंतर संपूर्ण शरीर जसेच्या तसे जतन केले जाऊ लागले आहे. जतन प्रक्रिया निधनानंतर काही क्षणात सुरु केली जाते. यासाठी ड्राय आईसचा वापर होतो. द्रवरुप नायट्रोजनच्या मदतीने पद्धतशीरपणे मृत शरीर उणे १३० अंश तापमानाला आणले जाते. कमालीचा वैद्यकीय काटेकोरपणा आणि कौशल्य असणारे डॉक्टर हे काम करतात; कारण अतिशीतकरण करताना शरीरपेशी ठार होण्याचा धोका टाळावा लागतो. पेशी जिवंत ठेवून त्यांचे निर्जलीकरण करण्याची अवघड प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर मृत शरीर जतन केले जाते. ही मृत शरीरे जतन करणाऱ्या प्रयोगशाळा अमेरिका, रशिया आणि इंग्लंडमध्ये अस्तित्वात आल्या आहेत. काही खासगी कंपन्यांनी सुरु केलेल्या या जतनासाठी भलीमोठी ‘वेटिंग लिस्ट’ आहे. मृत शरीरात पुन्हा प्राण फुंकता येतील का, याबद्दलची कोणतीही शाश्वती सध्याच्या विज्ञानाला देता येत नाही. तरीही भविष्यात कधीतरी विज्ञान तेवढी प्रगती करेल आणि आपला पुनर्जन्म होईल, या आशेने या तंत्रासाठी धनाढ्य पैसे खर्चू लागली आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, राजश्री पाटील यांच्या नातवांच्या जन्माची कथा..

बातम्या आणखी आहेत...