आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INX मीडिया केस: कार्ती चिदंबरम यांना 5 दिवसांची CBI कस्टडी, 3.5Cr लाच घेतल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा एक दिवसाच्या सीबीआयच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. - Divya Marathi
कार्तीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा एक दिवसाच्या सीबीआयच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक करण्यात आलेले कार्ती चिदंबरम यांना गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयने चिदंबरम यांची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम यांना बुधवारी लंडनहून परत आल्यानंतर चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आले होते. त्यानंतर चिदंबरम यांना दिल्लीला आणण्यात आले. येथे त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. न्यूज एजन्सीने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या जबाबानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

 

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा कार्तीवर आरोप आहे की त्याने वडील मंत्रीपदी असताना पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया कंपनीला 305 कोटींच्या परकीय गुंतवणुकीला मंजूरी मिळवून दिली होती. या बदल्यात 3.5 कोटी रुपये लाच घेतल्याचा कार्तीवर आरोप आहे. ही मंजूरी परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाने (एफआयपीबी) दिली होती. 

 

सीबीआय म्हणाले- कार्तीने गोलमाल उत्तरे दिली 
- सीबीआयने म्हटले आहे की आतापर्यंत कार्तीची फार थोडावेळ चौकशी झाली आहे. मात्र त्याने गोलमाल उत्तरे दिली आहेत. 
- दुसरीकडे ईडीने कोर्टात कार्तीचे चार्टर्ड अकाऊंटंट एस. भास्करन यांच्या जामीनाला विरोध केला आहे. 

 

काय आहे आयएनएक्स प्रकरण, कार्तीवर काय आरोप?
- मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण आयएनएक्स मीडियाशी संबंधीत आहे. आयएनएक्सचे डायरेक्टर पीटर आणि इंद्राणी मुखर्जी आहेत. हे दोघेही शीना बोरा हत्याकांडात आरोपी आहे.
- कार्तीवर आरोप आहे की त्याने आयएनएक्स मीडियाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (एफआयपीबी) याची गैरमार्गाने परवानगी मिळवून दिली. त्यानंतर आयएनएक्सला 305 कोटी रुपये फंड मिळाला होता. त्याबदल्यात कार्तीला 10 लाख डॉलर लाच देण्यात आली होती. 
- आयएनएक्स मीडिया आणि कार्तीच्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असलेल्या कंपन्या यांच्यात 3.5 कोटींचे व्यवहार झाले होते. 
- याशिवाय कार्तीवर आरोप आहे की त्याने इंद्राणीच्या कंपनीविरोधात टॅक्सचे एक प्रकरण त्याच्या वडिलांच्या पदाचा वापर करुन सेटल केले होते.

बातम्या आणखी आहेत...