आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी २०१४ पूर्वी कलम ३७० चा मुद्दा उचलला होता; २०१९ साठी ११ महिने आधी पुन्हा तोच मुद्दा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डिसेंबर २०१३ मध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे तत्कालीन उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जम्मूत एक जाहीर सभा घेतली होती. त्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या साडेसहा महिने अगोदर देशात एक नव्या चर्चेला सुरुवात केली होती. भारताच्या राज्यघटनेच्या कलम ३७० नुसार देशभरात चर्चा व्हायला हवी होती. त्यानुसार सर्वंकष विकास व सशक्तीकरणापासून जम्मू-काश्मीरला वंचित ठेवण्यात आलेले आहे. कलम ३७० भारताच्या संघराज्य प्रणालीत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करते. मोदींपूर्वी आपल्या भाषणात राजनाथ म्हणाले होते, संसदेत  कलम-३७० वर चर्चा व्हायला हवी. या कलमाचा राज्यातील जनतेला काही लाभ आहे का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. 


त्यानंतर संपूर्ण सहा महिने  २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी देशात भाजपने कलम ३७० ला राजकीय मुद्दा बनवले. भाजपच्या जाहीरनाम्यात कलम ३७०, काश्मिरी पंडित, समान नागरी कायदा इत्यादी मुद्दे समाविष्ट होते. परंतु सत्तेनंतर ४ वर्षांपर्यंत सरकारने एकदाही कलम-३७० चा मुद्दा उचलला नाही किंवा संसदेत, जनतेतही चर्चा केली नाही. आता २०१९ लोकसभा निवडणुकीला ११ महिने असताना भाजपने पीडीपीसोबतची आघाडी मोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावरून कलम ३७०, काश्मिरी पंडित, दहशतवादासारख्या मोठ्या मुद्द्यांबाबत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्याचा भाजपने एक प्रकारे देशाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 


पन्नासच्या दशकापासून कलम ३७० च्या विरोधात भाजप आवाज उठवतोय 
भाजप कलम ३७० ला हटवण्यासाठी पन्नासच्या दशकापासून आवाज उठवण्याचे काम करत आहे. जम्मू-काश्मीरच्या एकीकरणातील हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे भाजपला वाटते. सर्वात अगोदर जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी कलम ३७० च्या विरोधात आवाज उठवला होता. १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली होती. १९८० मध्ये जनसंघाचे भाजप असे नामकरण झाले. 


कलम ३७० च्या लढ्यातच श्यामाप्रसाद मुखर्जींचे गेले प्राण
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी कलम ३७० च्या विरोधात होते. भारत छोट्या-छोट्या तुकड्यांत विभागला जात आहे. हे कलम तीन राष्ट्रांंच्या सिद्धांताला लागू करण्याची एक योजना आहे, असे ते म्हणाले होते. १९५३ मध्ये काश्मीर दौऱ्यात त्यांनी उपोषण केले होते. २३ जून ५३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. 


भाजपने नेहमीच निवडणुकीतील मुद्दा बनवले कलम-३७० ला
कलम ३७० ला भाजपने नेहमीच निवडणुकीतील एक मुद्दा बनवण्याचे काम केले आहे. १९९६, १९९९, २००४, २०१४ दरम्यान हा मुद्दा उचलण्यात आला. परंतु आपल्या सत्तेच्या काळात १९९९ पासून २००३ व २०१४ ते २०१७ पर्यंत भाजपने या मुद्द्यावर सोयीस्कर मौन साधले होते. 


राष्ट्रवादाचा मुद्दा बनवून भाजपचा कार्यकर्त्यांना संदेश
पीडीपीने शह देण्याच्या अगोदर भाजपने मात देण्याचे काम केले आहे. सप्टेंबर-ऑक्टाेबरमध्ये पीडीपी ऑपरेशन ऑल आऊटच्या विरोधात मानवाधिकार व मुस्लिमांचा मुद्दा बनवून जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे भाजपच्या नेतृत्वापर्यंत पोहोचले होते. त्यावरून ईद पासूनच भाजपच्या नेतृत्व पातळीवर मंथन सुरू होते. केवळ वेळेची प्रतिक्षा होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सुरक्षेशी संबंधित सर्व पैलूंचा विचार करून देशाचे अखंडत्व आणि राष्ट्रवादाच्या नावावर अगोदरच आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयातून भाजपने पीडीपीला कठघऱ्यात उभे केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...