आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची आवडती ‘बार्बी’ बाहुली आता साठीत, खेळण्यांचा चौथा मोठा ब्रँड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

९ मार्च १९५९ ला पहिली बार्बी बाजारात आली होती. त्या वर्षी कंपनीने ३ लाख ५० हजार बाहुल्या विकल्या होत्या. तेव्हा तिची किंमत ३ डॉलर होती.


अमेरिकेतील मॅटल या अमेरिकी खेळणी कंपनीच्या सहसंस्थापक रुथ हँडलर यांनी बार्बी बाहुली तयार केली होती. त्यांची मुलगी बार्बरा कागदाद्वारे तयार केलेल्या बाहुल्यांशी खेळत असे. त्यातून त्यांना बार्बी बाहुली तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी बाइल्ड लिली या जर्मन बाहुलीकडून प्रेरणा घेत बार्बी बनवली.

 

चांगल्या केसांच्या बार्बीची सर्वाधिक विक्री
५९ वर्षांत बार्बीच्या माॅड बार्बी, प्लॅटिनम बार्बी, सुपरसाइज बार्बी यासारख्या अनेक अावृत्त्या अाल्या; परंतु १९९२ मध्ये अालेली टाेटली हेअर बार्बी सर्वात जास्त हिट ठरली.त्यांची एक काेटीहून जास्त विक्री.

 

मूल्य २,६९१ काेटी रुपये
२०१८ मध्ये बार्बीचे ब्रँड मूल्य २,६९१ काेटी रुपये एवढे अाहे. हा जगातील चाैथा सर्वात माेठा खेळण्यांचा ब्रँड. ४९,२११ काेटींचा लिअाे हा सर्वात माेठा टाॅय ब्रँड अाहे.

 

१८० प्रकारच्या रूपांत सादर
बार्बी १८० प्रकारच्या विविध रूपांत सादर झाली अाहे. २०१६ मध्ये ती राष्ट्रपतीच्या रूपात, त्यापूर्वी १९६१ मध्ये परिचारिका, १९६५ मध्ये अंतराळवीर, १९९९ मध्ये विमानचालक बनली अाहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...