आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यार्पणाच्या बातम्या पूर्णपणे खोट्या, सुरक्षित वाटेपर्यंत परतणार नाही : झाकीर नाईक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर/नवी दिल्ली- मलेशियात असलेले वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक यांना भारतात पाठवले जाणार असल्याची चर्चा आहे. प्रक्षोभक भाषणे, मनी लाँडरिंग  अतिरेकी संघटनांना अर्थ पुरवठा करण्याच्या प्रकरणात नाईक आरोपी आहेत. एनआयएने त्यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. 


दरम्यान, नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्यार्पणाच्या बातम्या पूर्णपणे खोट्या व बिनबुडाच्या असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, भारतात माझ्यावर पक्षपाती खटला चालवला जाऊ शकतो. जोवर मला सुरक्षित वाटणार नाही तोवर भारतात परतण्याचा माझा कोणताही विचार नाही. सरकार निष्पक्ष आहे, असे मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी परतेन. 

२०१६ मध्ये ढाक्यात अतिरेकी हल्ल्यात सहभाग असलेल्या इसिसच्या अतिरेक्यांना झाकीर नाईक यांच्या भाषणातूनच प्रेरणा मिळाली होती, असे म्हटले जाते.


प्रत्यार्पणाची माहिती नाही : एनआयए, परराष्ट्र खाते
नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत मलेशियाकडून कोणतीही माहिती मिळालेली नसल्याचे एनआयए व परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले.  जानेवारीत परराष्ट्र खात्याने मलेशियाकडे औपचारिक प्रत्यार्पणाची विनंती केली होती. झाकीर नाईक २०१६ पासून मलेशियातील पुत्रजाया शहरात असून तेथे त्यांना मलेशिया सरकारने कायमस्वरूपी निवासाची परवानगी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...