आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशनल स्टाफ सोडून इतर कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम बंद; केंद्र सरकारचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या सेवेत असलेले ऑपरेशनल अर्थात कार्यालयीन कामकाज व्यवस्थित चालावे म्हणून तांत्रिक किंवा इलेक्ट्रिक उपकरणांची देखभाल करणारे कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम भत्ता बंद करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारचे सर्व विभाग व मंत्रालयांना हा निर्णय लागू असेल. यासंबंधीचा आदेशही केंद्राने काढला आहे. 


ऑपरेशनल स्टाफलाही बायोमेट्रिक उपस्थितीच्या आधारे ओव्हरटाइम भत्ता दिला जाईल. तो वाढवला जाणार नाही. 


कोणते कर्मचारी पात्र 
जे राजपत्रित नाहीत आणि कार्यालयांतील कामकाज सुरळीत चालावे म्हणून तांत्रिक व इलेक्ट्रिकल उपकरणांची देखभाल करणाऱ्यांचा यात समावेश होतो. अशांची वेगळी यादी करण्याच्या सूचना मंत्रालये, विभागांना दिल्या आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...