आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणितात शून्य गुण तरीही स्टेट बँकेत अधिकारी; 29 डिसेंबर रोजी झाल्या 3 तरुणांच्या नियुक्त्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडियात बँकेच्या प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या नोकर भरतीच्या प्रक्रियेत खूप गंभीर प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. ज्या विद्यार्थ्यांना गणितात शून्य गुण मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनाही प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती दिली. हे विद्यार्थी २९ डिसेंबर रोजी नोकरीत रुजूही झाले आहेत. हे प्रकरण सोशल मीडियामुळेच उघडकीस आले. काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. ८ जानेवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाने एसबीआयला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आता या प्रोबेशनरी अधिकाऱ्यांचे भवितव्य आता न्यायालयाच्या  निर्णयावर अवलंबून आहे. 


विद्यार्थ्यांनी शेअर केली त्यांची गुणपत्रिका  
निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांपैकी काहींनी आपली गुणपत्रिका  फेसबुक व पागलगाय डॉट कॉमवर शेअर केली होती. रोल क्रमांक आणि गुणपत्रिकेच्या अाधारे त्यांच्या सर्व विषयांचे गुण पाहिले तेव्हा तीन विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे दिसले. या उमेदवारांची एकूण गुणसंख्या कट ऑफपेक्षाही जास्त होती.

बातम्या आणखी आहेत...