आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावाच्या हिंसाचारावर आदेश जारी करू, कायदा हाती घेण्याची परवानगी नाही : सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टात मंगळवारी गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर सुनावणी झाली. कोर्टाला सांगण्यात आले की, जमावाचे मनोबल इतके वाढले आहे की आता मुलांच्या चोरीच्या आरोपाखाली लोकांना ठेचले जात आहे. त्यावर कोर्ट म्हणाले, कुणीही कायदा हाती घेऊ शकत नाही. अशा घटना रोखणे राज्यांची जबाबदारी आहे. गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसाचाराशी निगडित याचिकांवर निकाल राखून ठेवत कोर्ट म्हणाले की, याबाबत सविस्तर आदेश जारी केला जाईल. 


ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह म्हणाल्या, हिंसाचाराच्या या घटनांमागे एक खास पॅटर्न आणि उद्देश दिसतो. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, हा जमावाचा हिंसाचार असून तो गुन्हाच आहे. केंद्राने घटनेच्या २५७ व्या तरतुदीनुसार योजना तयार केली पाहिजे. 


व्हॉट्सअॅपला निर्देश 
सोशल मीडियातील अफवांमुळे अप्रिय घटना सुरू असताना केंद्राने व्हॉट्सअॅपला निर्देश दिले. आपल्या व्यासपीठावरून व्हॉट्सअॅपने बेजबाबदार व प्रक्षोभक मेसेज रोखले पाहिजेत, असे व्हाॅट्सअॅपला बजावण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...