आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking भय्यू महाराज इज लाइव्ह.. मॅसेज आला आणि चकित झाले सर्व लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - अध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येला जवळपास महिना पूर्ण होत आला आहे. भय्यू महाराजांच्या जाण्याच्या त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. जणू आधारवड गेला अशी त्यांच्या अनुयायांची अवस्था झाली. मात्र गुरुवारी सायंकाळी फेसबूकवर भय्यू महाराजांना फॉलो करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भय्यू महाराज Live असल्याचे नोटिफिकेशन आले आणि अनुयायांना काही क्षणासाठी जणू धक्काच बसला. 


गुरुवारी सायंकाळी Live ...
भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतरही त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट सुरू ठेवण्यात आले आहे. 12 जून रोजी भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर जवळपास 29 जूनपर्यंत त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून काहीही पोस्ट करण्यात आले नव्हते. मात्र, 29 जूननंतर त्यांच्या अकाऊंटवरून त्यांची भाषणे किंवा त्यांच्या कलश यात्रेबाबतचे अपडेट्स, प्रेरणादायी संदेश पोस्ट करण्यात येत होते. त्यातच 5 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास भय्यूजी महाराज Live असल्याचे नोटिफिकेशन आले. अनुयायांना लवकर काही कळेना मात्र व्हिडिओ पाहिला तर इंदूर येथील सूर्योदय आश्रमातील सायंकाळी 7 वाजेची आरती यावेळी लाइव्ह होत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले. 


अनुयायांनी केले स्वागत 
अशा प्रकारे व्हिडिओ लाइव्ह पाहिल्यानंतर अनेक अनुयायांनी फेसबूकवरच आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. महाराज कायम आपल्यात राहणार आहेत, असे अनेकांनी पोस्ट केले. काही अनुयायांनी अशाच प्रकारे रोज आरती लाइव्ह करण्याचा सल्लाही प्रतिक्रियांमधून दिला. 


दर्शन यात्रेला सुरुवात 
भय्यू महाराजांच्या अनुयायांना त्यांच्या स्मृती चिन्हांचे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन यात्रेलाही गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून भय्यू महाराजांचे विचार आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. या दर्शन यात्रेत कलश, गुरू आसन, गुरू प्रतिमा, गुरू पादुका, गुरूचरित्र ग्रंथ, नवनाथ ग्रंथ यांचे दर्शन अनुयायांना घेता येईल. इंदूरहून निघालेली ही यात्रा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून प्रवास करत २७ जुलैला गुरूपौर्णिमेला इंदूरच्या आश्रमात पोहोचेल. 


समाधीसाठी नद्यांचे जल आणि माती गोळा करणार 
या यात्रेदरम्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध नद्या आणि धार्मिक स्थळाचे जल आणि माती एकत्रित केली जाणार आहे. इंदूरला या पवित्र जल आणि मातीतून भय्यू महाराजांची समाधी तयार केली जाईल. सूर्योदय संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी या यात्रेचे नियोजन केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...