आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-जॉर्डनमध्ये 12 करार, दहशतवादाची लढाई धर्माच्या विरोधात नाही : नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी गुरुवारी विज्ञान भवनात इस्लामिक हेरिटेज कॉन्फरन्सला संबोधित केले. दोघांनी दहशतवादांवर निशाणा साधताना त्याला कोणत्याही धर्माशी न जोडण्याचा सल्ला दिला. मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती बहुआयामी आहे, तीत सर्व धर्मांना रुजण्याची संधी मिळाली आहे. आमची परंपरा आणि मूल्ये, आमच्या धर्मांचा संदेश आणि त्यांची तत्त्वे यांच्यात मोठी ताकद असून त्याच्या बळावर आम्ही हिंसा आणि दहशतवाद यांसारख्या आव्हानांवर मात करू शकतो. दहशतवादाविरोधातील मोहीम कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. जे युवकांची दिशाभूल करून त्यांना हिंसेच्या मार्गावर नेतात त्यांच्या मानसिकतेविरोधात आहे. तत्पूर्वी राजे अब्दुल्ला यांना राष्ट्रपती भवनात मानवंदना देण्यात आली. मोदी आणि अब्दुल्ला यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही देशांत १२ करार आणि एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या.

 

 

हे १२ करार झाले

- संरक्षण

- डिप्लोमॅटिक, सरकारी पासपोर्ट धारकांना सूट

- सांस्कृतिक आदानप्रदान

- मनुष्यबळ सहकार्य

- आरोग्य,औषधे 

- सेंटर फॉर एक्सलन्स-रॉक फॉस्फेट आणि खते

- जकात आणि कर

- आग्रा आणि पेट्रा शहर 
- आयआयएमसी आणि जॉर्डन मीडिया इन्स्टिट्यूट

- प्रसारभारती आणि जॉर्डन टीव्ही

- जॉर्डन विद्यापीठ - आयसीसीआर.

 

दहशतवादाची लढाई कट्टरवाद, हिंसा आणि द्वेषाच्या विरोधात : राजे अब्दुल्ला

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला म्हणाले की, आज आपण बातम्यांत धर्माशी संबंधित गोष्टी वाटतो, ऐकतो. त्यातून लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. जगभरातील वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित संशयित एकमेकांना ओळखतही नाहीत. अशा द्वेषाची विचारसरणी देवाने बनवलेले जग नष्ट करेल. जॉर्डनने नेहमीच जगात शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. जग एका कुटुंबाप्रमाणेच आहे. सर्व देशांच्या लोकांना चांगल्या भविष्यासाठी जबाबदारी वाटून घ्यावी लागेल. दहशतवादाच्या विरोधातील लढाई कोणता धर्म किंवा लोकांच्या विरोधात नाही, तर सर्व समुदायांतील कट्टरवाद, हिंसा आणि द्वेषाच्या विरोधात आहे. पैगंबर मोहम्मद साहेबांनी करुणा, दया आणि मानवतेचा उपदेश दिला होता. माझी त्यावरच श्रध्दा आहे. तेच मी माझ्या मुलांना शिकवतो. आज तेच जगातील १ अब्ज ८० कोटी मुस्लिमांना सांगत आहे.

 

धर्म : सर्व धर्म आणि मते भारताच्या मातीत वाढले

अब्दुल्लांना उद्देशून मोदी म्हणाले की, तुम्ही स्वत: विद्वान आहात, भारताशी परिचित आहात. जगातील सर्व धर्म भारतात रुजले-वाढले आहेत, हे तुम्ही जाणता. सर्व धर्म आणि मते भारताच्या माती वाढले. येथील वातावरणात ते वाढले आहेत.

 

युवा : मुस्लिम युवकांच्या हाती कुराण, संगणक असावे

मोदी म्हणाले की, मुस्लिम युवकांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक असावे, असे आमचे स्वप्न आहे. मुस्लिम युवक आधुनिकीकरण आणि ज्ञान-विज्ञानाच्या जगाशी जोडले जावेत आणि तेथेही आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवावे, असे आम्हाला वाटते.

 

भारत : येथे होळी, गुड फ्रायडे आणि रमजान साजरा होतो

मोदींनी भारताच्या गंगा-यमुना संस्कृतीची स्तुती केली. ते म्हणाले, सध्या भारतात होळी साजरी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी बौद्ध नववर्ष आणि या महिनाअखेर गुड फ्रायडे व बुद्ध जयंती साजरी होईल. नंतर रमजानचा पवित्र महिना आहे.

 

गंगा-जमुनी परंपरेचा मिलाफ

- मोदी म्हणाले, 'भारताची राजधानी दिल्ली आहे. पूर्वीच्या मान्यतांनुसार याचे नाव इंद्रप्रस्थ आहे. सुफी परंपरा देखील येथूनच आली आहे. सैफुद्दीन औलिया इथलेच होते. भारत हा गंगा-जमुनी परंपरेचा मिलाफ आहे.'

 

भारत-जॉर्डन एकत्र काम करणार 
- मोदी म्हणाले, 'तुम्ही जे पाऊल उचलले आहे त्यामुळे विरोधी काम करणाऱ्यांना पायबंद घालता येणार आहे. अशी जबाबदारीची जाणीव जेव्हा निर्माण होईल तेव्हा मानवतेचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे. तुमच्या उपस्थितीने अशा उपक्रमांना अधिक ताकद मिळणार आहे. अशा चांगल्या कामासाठी भारत नेहमीच तुमच्यासोबत राहिल. हा विश्वास देण्यासाठीच एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय उलेमा आणि विद्वान येथे उपस्थित आहेत.'

 

दहशतवादाविरुद्ध लढणारे नेते म्हणून अब्दुल्लांची अाेळख
मध्य-पूर्वेत जेथे संघर्ष व युद्धाची स्थिती अाहे, तेथे जाॅर्डन हा देश स्थायित्व व ताळमेळास महत्त्व देताे. किंग अब्दुल्ला द्वितीय हे माेहंमद पैगंबर यांच्या 41व्या पिढीचे वंशज अाहेत. कट्टरपंथी व दहशतवादाविराेधात लढणारे नेते म्हणून अब्दुल्ला यांना जागतिक स्तरावर अाेळखले जाते. या दाैऱ्यात ते इस्लामवर मते व्यक्त करणार अाहेत. 1950 पासून भारत व जाॅर्डनमध्ये सकारात्मक संबंध अाहेत.

बातम्या आणखी आहेत...