आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले - समाजवाद, बहुजनांबाबत बोलणारे सत्तेचे लालची, त्यांना बंगल्यातच रस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शहराला \'नरकाचे प्रवेशद्वार\' म्हणूनही ओळखले जाते. - Divya Marathi
या शहराला \'नरकाचे प्रवेशद्वार\' म्हणूनही ओळखले जाते.

संतकबीर नगर - संत कबीरदास यांच्या 500 व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी गुरुवारी मगहरमध्ये होते. कबीरांच्या मजारीवर जाणारे ते पहिले पंतप्रधान बनले आहेत. याठिकाणी त्यांनी एका रॅलीतही सहभाग घेतला. यावेळी कबीरांचे विचार आणि दोह्यांचा वापर करत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मोदी म्हणाले, समाजवाद आणि बहुजनांबाबत बोलणारे सत्तेचे लालची आहे. उत्तर प्रदेशात यापूर्वीच्या सरकारांना फक्त त्यांच्या बंगल्यांमध्येच रस होता. त्यांचे मन फक्त आलिशान बंगल्यांत लागायचे. गरीबांसाठी घरे बनवताना ते शांत बसलेले असायचे. 


मोदींनी बंगल्यांचा उल्लेख दोन माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावतींच्या संदर्भात केला. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी बंगले रिकामे केले होते. मोदी म्हणाले दोन दिवसांपूर्वीच देशात आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण झाली. सत्तेची लालच अशी आहे की, आणीबाणी लावणारे आणि त्याला विरोध करणारे आता खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. या सर्वांना फक्त कुटुंबाचीच चिंता आहे. गरीबांना लुटून कोट्यवधींचे बंगले बनवणाऱ्यांपासून उत्तर प्रदेशने सावध राहायला हवे. 

 

तीन तलाकचा उल्लेख 
मोदी म्हणाले, तुम्ही तीन तलाकबाबतही विरोधकांची भूमिका पाहिली आहे. देशातील मुस्लीम भगिणी धमक्यांना न जुमानता यापासून मुक्ती मिळण्याची मागणी करत आहेत.  पण वोट बँकेचे राजकारण करणारे यात अडथळे आणत आहेत. 


काही पक्षांना अशांतचाच हवी 
संतांनी या देशासाठी खूप काही केले आहे. आज काही पक्षांना देशामध्ये अशांतताच हवी आहे. पण संतांच्या विचारांचे अनुसरण करणाऱ्या जनतेच्या मनात काय आहे हे त्यांना माहिती नाही. संत कबीर म्हणायचे, पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय.. 


मजारवर चढवली चादर 
मोदींनी संत कबीर यांच्या मजारवर चादर चढवली. त्यानंतर संत कबीर अॅकेडमीची कोनशिलाही रचली. 24 कोटी खर्चून तयार होणाऱ्या या अॅकेडमीत पार्क आणि पुस्तकालय याशिवाय कबीरांवर संशोधनही केले जाईल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...