आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pnb Fraud Lookout Notice Blue Corner Notice Has Been Issued Against Nirav Modi And Mehul Choksi

PNB घोटाळा:मेहुल चौकसीच्या 1217 कोटींची मालमत्ता जप्त; 15 फ्लॅट-17 ऑफिस-231 एकर जमीन जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहुल चौकसी याचा कोलकता येथील मॉल ईडीने जप्त केला आहे. - Divya Marathi
मेहुल चौकसी याचा कोलकता येथील मॉल ईडीने जप्त केला आहे.

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यात इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने (ईडी) गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चौकसीच्या कंपनीवर गुरुवारी कारवाई केली आहे. यात 1217.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात मुंबईतील 15 फ्लॅट, 17 ऑफिस, आंध्र प्रदेशातील मेसर्स हैदराबाद सेज, कोलकाता येथील एक शॉपिंग मॉल, अलीबाग येथील फार्महाऊस आणि महाराष्ट्रसह तामिळनाडूतील 231 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. याआधी 12,672 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात  बुधवारी बँकेचे इंटरनल चीफ ऑडिटर एम.के. शर्मा यांना अटक करण्यात आली. दुसरीकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पुढाकारने ब्यूरो ऑफ इमिग्रेशनने घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्याविरोधात लुकआऊट / ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. हे दोघेही सध्या विदेशात पळून गेले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे. 

 

एखाद्या ऑडिटरला प्रथमच अटक 
- तपास यंत्रणांनी सांगितल्यानुसार, इंटरनल चीफ ऑडिटर एम.के. शर्मा यांच्याकडे पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस ब्रँचचे ऑडिटिंग सिस्टिम आणि त्यासंबंधीच्या कामावर लक्ष्य ठेवण्याचे काम होते. त्यासोबतच बँकेत काही अनियमीतता होत असेल तर झोनल ऑफिसला रिपोर्ट करण्याची जबाबदारी होती. 
- सीबीआय यापद्धतीने शर्मा यांची चौकशी करणार आहे. या प्रकरणात एखाद्या ऑडिटरची अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

 

नीरवच्या 4 मालमत्ता जप्त 
- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बुधवारी नीरव मोदीच्या 4 मालमत्ता जप्त केल्या. यात 13 कोटी रुपये किंमतीचे अलीबाग येथील फार्महाऊस आणि अहमदनगर येथील 70 कोटी रुपयांचा सोलर प्लँट यांचा समावेश आहे. 
- मेहुल चौकसीच्या गीतांजली ग्रुपचे 1.45 कोटी जमा रक्कम असलेले 34 खाते आणि एफडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने गोठवले आहेत. 

 

सीबीआय तपासात सहकार्यास नकार 
नीरव मोदीने सीबीआयच्या तपासात सहकार्यास नकार दिला आहे. सीबीआयने नीरवला मेल पाठवून तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. या मेलला दिलेल्या उत्तरात नीरव मोदी म्हणाला, 'भारताबाहेरही माझे अनेक उद्योग आहे. त्यामुळे मी चौकशीसाठी येऊ शकत नाही. मला विदेशातील माझ्या व्यवसायावर लक्ष्य द्यावयाचे आहे.' पीएनबीतील घोटाळा समोर येण्याच्या एक आठवडा आधी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चौकसी यांनी भारतातून पळ काढला होता. 

- सीबीआयने नीरवला मेल पाठवला होता. नीरवने म्हटल्यानुसार, सीबीआयने त्यात म्हटले होते की तो ज्या देशात असेल तेथील उच्चायुक्तांकडे त्याने संपर्क करावा. सीबीआय त्याच्या प्रवासाची पूर्ण व्यवस्था करेल. 

 

आतापर्यंत काय झाले? 

- पीएनबी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या देशभरातील शोरुम्सवर छापेमारी केली. यात 22 कोटींची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच कित्येक हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. 
- नीरव मोदीची भारतातील 6,393 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मोदी आणि चौकसी या दोघांच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची मोजणी सुरु आहे. 
- देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यात आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे. यातील 5 जण हे बँकेचे अधिकारी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...