आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांत चौथ्यांदा राष्ट्रपती राजवट, अमरनाथ यात्रेपर्यंत वोहराच राज्यपाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- पीडीपी, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स तिघांनीही कोणाबरोबरही आघाडी करणार नसल्याचे म्हटले आहे. 

- मार्च 2015 मध्ये भाजपतच्या पाठिंब्यावर मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री बनले होते. त्यांच्या निधनानंतर मेहबुबा मुफ्ती मुख्यमंत्री बनल्या. तर उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे होते. 
- असे सांगितले जात आहे की, मेहबुबा यांच्या दबावात रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात एकतर्फी शस्त्रसंधी झाली. पण त्यादरम्यान दहशतवादी हल्ले वाढले. 


श्रीनगर - जम्मू-काश्मीरमद्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी‌) आणि भाजप आघाडीचे सरकार पडल्यानंतर 24 तासांतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी बुधवारी सकाळी तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यास मंजुरी दिली. मंगळवारी सायंकाळी राज्यपाल एनएन वोहरा यांनी राष्ट्रपतींना अहवाल पाठवला होता. वोहरा यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपत आहे. पण अमरनाथ यात्रा संपेपर्यंत ते राज्यपाल असतील असे सांगितले जात आहे. अमरनाथ यात्रा 28 जून ते 26 ऑगस्टपर्यंत चालेल. 

 

राज्यात गेल्या 10 वर्षांत चौथ्यावेळी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. पीडीपी आणि भाजप यांच्यात सव्वा तीन वर्षांपूर्वी आघाडी झाली होती. भाजपने मंगळवारी आघाडी तोडत मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढला. काँग्रेस आणि पीडीपीने एकमेकांशी आघाडीची शक्यता फेटाळली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सनेही कोणत्याही आघाडीचे मार्ग बंद केले आहेत. 


जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 11 निवडणुका झाल्या, त्यापैकी 8 वेळा राष्ट्रपती राजवट लागली 

 

केव्हा लागली राष्ट्रपती राजवट 

1957-1977 
सर्वात आधी 1957 मध्ये निवडणुका झाल्या. नॅशनल कॉन्फरन्सला 75 पैकी 68 जागा मिळाल्या. बख्शी गुलाम मो. वजीर-ए-आजम बनले. 1962 मध्येही काँग्रेसने विजय मिळवला. 1967-72 मध्ये काँग्रेसचा विजय झाला. 1975 मध्ये इंदिरा यांचा नॅशनल कॉन्फरन्सबरोबर करार झाला. काँग्रेसच्या मीर कासीम यांनी अब्दुल्लांसाठी खुर्ची सोडली. 

1977-1982 
1977 मध्ये काँग्रेसने पाठिंबा काढत अब्दुल्लांचे सरकार पाडले. त्यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झाली. 1977 च्या निवडणुकांत नॅशनल कॉन्फरन्सने विजय मिळवला शेख अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री बनले. 1982 मध्ये शेख अब्दुल्लांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले. काँग्रेसच्या मदतीने अब्दुल्ला यांचे मेहुणे गुलाम शाह यांनी सरकार पाडले. शाह दोन वर्षे मुख्यमंत्री राहिले. 6 मार्च, 1986 ते 7 नोव्हेंबर, 1986 पर्यंत राष्ट्रपती राजवट राहिली. 

1986-2002 
1986 मध्ये निवडणुकांत पुन्हा नॅशनल कॉन्फरन्सचा विजय झाला आणि फारुक अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले. 1990 मध्ये जगमोहन राज्यपाल बनण्याच्या विरोधात राजीनामा दिला. 1996 पर्यंत राष्ट्रपती राजवट राहिली. 1996 च्या निवडणुकीत पुन्हा नॅशनल कॉन्फरन्सला यश मिळाले. फारुख तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. 

2002-2018 
2002 मध्ये काँग्रेस-पीडीपीची सत्ता आली. मुफ्ती सईद सीएम बनले. 3 वर्षांनी काँग्रेसचे गुलाम नबी आझाद सीएम बनले. पीडीपीने सरकार पाडले. 2008 मध्ये निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले. 2014 मध्ये निवडणुका झाल्या. 2015 मध्ये भाजप पीडीपी आघाडी झाली. पीडीपीचे मुफ्ती सईद पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यांच्या निधनानंतर मेहबुबा राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या. 

बातम्या आणखी आहेत...