आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरामध्ये प्रत्येकी 60 मतदारांमागे एक, तर प्रत्येक बूथवर 10 तरुण होते तैनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत करत आहेत. परंतु तुमच्यावर कम्युनिस्टमुक्त भारत करण्याची जबाबदारी आहे’, सुनील देवधर यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काढलेले हे उदगार. ही गोष्ट तशी सोपी नव्हती. परंतु ६०० दिवसांपासून आगरतळ्यात भाड्याच्या खोलीत राहून पक्षाची रणनीती ठरवणारे देवधर यांना शहा यांच्या अडीच वर्षे जुन्या टिप्पणीचे मर्म लक्षात आले होते.

 

म्हणूनच गतवेळी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झालेल्या पक्षाचे यंदा बहुमत असलेले सरकार सत्तेवर येऊ घातले आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी वापरलेल्या डावपेचांनाच भाजपने त्रिपुरात वापरले.  
डाव्यांवर उजव्या विचारसरणीचा विजय झाल्याचा भाजपमध्ये सर्वात जास्त आनंद दिसून येतो. डाव्यांचा गड असलेल्या एखाद्या राज्यात भाजपने विजय मिळवण्याची पहिलीच वेळ आहे. खरे तर भाजपने २०१४ मध्ये त्रिपुरात प्रभाग स्तरावर मोर्चेबांधणीचे काम केले.


राज्यातील ३ हजार २१४ बूथवर उत्तर प्रदेशसारखी रणनीती अवलंबिली. प्रत्येक बूथवर भाजपने ‘वन बूथ-टेन यूथ’ हा फॉर्म्युला लागू केला. त्याचबरोबर प्रत्येक बूथवर १०-१० महिला, एससी, एसटी, आेबीसी, अल्पसंख्याक व शेतकऱ्यांनाही जोडण्याचे काम केले. २७०० बूथवर १०-१० महिलांची टीम तयार केली. त्याशिवाय त्रिपुराच्या मतदार यादीत एकूण ४८ हजार पानांपैकी ४२ हजार पानांवरील बूथवर भाजप कार्यकर्ते तैनात होते. एका पानावर ६० मतदार होते. त्यानुसार त्रिपुरात प्रत्येकी ६० मतदारांसाठी भाजपने एक कार्यकर्ता नेमला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला.

 

यूपी फॉर्म्युला : शहांनी आधी देब यांना प्रदेशाध्यक्ष बनवले, नंतर देवधरांकडे धुरा 

अध्यक्ष शहा यांनी त्रिपुरात अगोदर राज्याचे तरूण नेते बिप्लव देव यांच्याकडे प्रदेशाची सूत्रे सोपवली. देव पूर्वी खासदार गणेश सिंह यांचे स्वीय सहायक होते. पुढे ते संघटनेत सक्रिय झाले. मात्र मोदी वाराणसी मतदारसंघाचे प्रभारी राहिलेले सुनील देवधर यांच्याकडे त्रिपुराचे प्रभारी पद सोपवण्यात आले. नंतर शहांनी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बूथ तैनातीच्या रणनीतिला प्रभावीपणे अंमलात आणले.  

 

सर्वात मोठा चेहरा : देवधरांनी डाव्यांच्या कमकुवत बाबींचे केले शस्त्र  

त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर म्हणाले, डावे पक्षांचे कार्यकर्ते काही साधे नाहीत. परंतु त्यांच्यात एक उणीव आहे. ते सत्तेवर येताच प्रशासनात राजकारण आणतात आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण करू लागतात. पुढे बूथ स्तरावरील कार्यकर्ता देखील पक्षावर अवलंबून राहू लागतो .सरकारी योजना लाटू लागतो, असे देवधर म्हणाले. त्यामुळे डावे प. बंगालमध्ये संपले.  

 

विरोधकांत फूट : हेमंत शर्मा व त्रिपुरा काँग्रेस अध्यक्ष देबबर्मा यांची भेट-चर्चा

भाजपच्या या विजयात विरोधकांती फूट देखील महत्त्वाची ठरली. निवडणुकीदरम्यान भाजपचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बिक्रम देबबर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्रिपुरातील राजेशाही परिवारातून आलेल्या देबबर्मा यांचा भाजपशी सौदा झाला. त्यामुळेच भाजप आदिवासी प्रभाव असलेल्या २० जागी विजयी होऊ शकले.  

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, त्रिपुरात 50 टक्‍के भाजप उमेदवार 5 वर्षांत बनले सदस्‍य...

 

हेही वाचा,

भाजपच्‍या विजयाचे 4 शिल्पकार: 36 वर्षांपासून खाते नसताना शून्‍यापासून शिखरापर्यंत पोहोचवल

 

 

बातम्या आणखी आहेत...