आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकचा 8 मिनिटांचा Video आला समोर, 21 महिन्यांपूर्वीची Pok तील कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑपरेशनदरम्यान जवानांच्या हेल्मेटवर लावलेले कॅमेरे आणि आकाशातील ड्रोनद्वारे ही कारवाई रेकॉर्ड करण्यात आली होती. (फोटो व्हिडिओ फुटेजमधून घेतले आहेत) - Divya Marathi
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑपरेशनदरम्यान जवानांच्या हेल्मेटवर लावलेले कॅमेरे आणि आकाशातील ड्रोनद्वारे ही कारवाई रेकॉर्ड करण्यात आली होती. (फोटो व्हिडिओ फुटेजमधून घेतले आहेत)

- उरी येथील दहशतवादी हल्ल्यात 21 जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्जिकल स्ट्राइक केले होते. 

- समोर आलेल्या व्हिडिओला अद्याप लष्कराने दुजोरा दिलेला नाही. 

 

नवी दिल्ली - उरी येथील दहशतवादी ह्ल्लायाचा बदला घेण्यासाठी भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केली होती. त्याच्या 21 महिन्यांनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. सुमारे आठ मिनिटांच्या हा व्हिडिओ नेमका कोणी समोर आणला हे मात्र स्पष्ट नाही. लष्करानेही या व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही. ऑपरेशनदरम्यान जवानांच्या हेल्मेटवर लावेलेल कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हे रेकॉर्डिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. 

18 सप्टेंबर 2016 रोजी उरी येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 21 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 11 दिवसांनी 29 सप्टेंबरला भारतीय लष्कराने एलओसी पार करत तीन किलोमीटरपर्यंत आत जाऊन दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. सर्जिकल स्ट्राइकमध्ये रॉकेट लॉन्चर, क्षेपणास्त्रे आणि लहान शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. 


विरोधकांनी मागितले होते पुरावे 
सर्जिकल स्ट्राइकनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह अनेक विरोधी नेत्यांनी पुरावे मागितले होते. त्यानंतर त्यांना मोठ्या विरोधाचा सामनाही करावा लागला होता. माजी मंत्री अरुण शौरी यांनी नुकतेच सर्जिकल नाही तर फर्जिकल स्ट्राइक झाली होती, असे म्हटले होते. सरकारने पुराव्याबाबत नेहमी सांगितले की, हा लष्कराच्या रणनितीचा भाग आहे. असे दस्तऐवज सादर करून शत्रूचू मदत करता येऊ शकत नाही. सर्जिकल स्ट्राइकपूर्वी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, एनएसए अजित डोभाल आणि तत्कालीन डीजीएमओ रणबीर सिंह यांनी जवळपास 10 दिवस प्लानिंग केले होते. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...