आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YogaDay बंदुकांचा व्यापारी होता हा योग गुरू, सगळे म्हणायचे फ्लाइंग योगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - जगभरात आज योग दिन साजरा केला जात आहे. आज योग म्हटले की बाबा रामदेव डोळ्यासमोर उभे राहतात. पण 70-80 च्या दशकात एक असे योगगुरू होते ज्यांचा थाटच और होता. थेट पंतप्रधानां घरापर्यंत त्यांची मजल होती. खासगी विमानाने प्रवास करायचे आणि व्यवसाय औषधी किंवा कॉस्मॅटिक्सचा नव्हे तर बंदुकांचा करायचे. 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात वादग्रस्त योगगुरू धीरेंद्र ब्रह्मचारीबाबत आपण बोलत आहोत. 


बंदुकांचे व्यापारी 
धीरेंद्र ब्रह्मचारी जम्‍मूमधील गांधीनगर इंडस्ट्रियल इस्‍टेटमध्ये शिव गन नानाची फॅक्टरी चालवायचे. रामचंद्र गुहा यांच्या 'इंडिया आफ्टर नेहरू' नुसार ब्रह्मचारी जेवढे मोठे योग गुरू होते तेवढेच मोठे व्यापारी होती. मीडिया रिपोर्टनुसार ब्रह्मचारींच्या फॅक्टरीत 1981, 82 में 3-3 हजार बंदुकांचे प्रोडक्शन जाले. कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 37 लाख झाला. शिव गन फॅक्टरी 800 रुपयांत सिंगल आणि 1,500 रुपयांत डबल बॅरल बंदुका विकायची. 


मोठे शस्त्र व्यापारी 
धीरेंद्र ब्रह्मचारी त्या काळातील सर्वात मोठे शस्त्र व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. रामचंद्र गुहांच्या मते, त्या काळातील सर्व मोठ्या आर्मी डील्समध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची असायची. त्या काळात स्वीडनच्या अनेक कंपन्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या फॅक्‍टरीत एकदा शंभरापेक्षा अधिक अवैध स्वीडिश बंदुका मिळाल्या होत्या. त्यावरून ब्रह्मचारी यांच्यावर बरीच टीका झाली होती. 

 
परदेशी बंदुका बाळगल्याचा आरोप 
1990 मध्ये धीरेंद्र यांच्यावर अवैध विदेशी शस्त्र बाळगल्याचा आरोप झाला. पोलिसांनी त्यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. नंतर त्यांना सशर्त जामीनावर सोडण्यात आले. पण हा फक्त आरोप असल्याचे ब्रह्मचारी म्हणाले. 

 
पुढे वाचा इंदिरा गांधींशी होती जवळीक.. 


 

 

बातम्या आणखी आहेत...