आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्ट पुन्हा म्हटले, चीफ जस्टीस हेच मास्टर ऑफ रोस्टर, खटले वाटपाचा अधिकार त्यांचाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा म्हटले आहे की, चीफ जस्टीस हेच मास्टर ऑफ रोस्टर आहेत. इतर न्यायमूर्तींच्या तुलनेत त्यांचे स्थान सर्वात आधी आहे. सुप्रीम कोर्टाने हे वक्तव्य वकील शांतीभूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केले. कोर्टाने भूषण यांच्या अर्जाची दखल घेण्यास नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने हेही म्हटले की, कोणतीही व्यवस्था अचूक नसते. न्यायपालिकेच्या कार्यपद्धतीचही सुधारणेला कायम वाव राहणार आहे. 

 
काय म्हणाले सुप्रीम कोर्ट 
सरन्यायाधीशांना विविध पीठांकडे खटले वाटप करण्याचा अधिकार आहे यात काही दुमतच नाही. हे विशेष कर्तव्य त्यांचेच आहे. ते सर्वात वरिष्ठ असतात. त्यांच्याकडे न्यायालयाच्या प्रशासकीय कामाच्या नेतृत्वाचा अधिकार असतो. दोन न्यायाधीशांच्या पीठानेही त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, कोणते प्रकरण कोणत्या बेंचकडे जाईल हे ठरवण्याचा विशेषाधिकार सरन्यायाधीशांचा आहे. 

 
न्यायालयीन परंपरेला तडा नको 
जस्टीस एके सिकरी म्हणाले की, न्यायपालिकेबाबत लोकांच्या मनात जर चुकीची भावना निर्माण झाली तर न्यायालयीन व्यवस्थेसाठी हा सर्वात मोठा धोका आहे. तर त्याचवेळी जस्टिस अशोक भूषण म्हणाले की, सुप्रीम कोर्टाची समृद्ध परंपरा राहिली आहे. वेळोवेळी ती सिद्ध जाली आहे. त्यामुळे त्या परंपरेला तडा जायला नको.  

बातम्या आणखी आहेत...