आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरामध्ये विचारांचा विजय, संसदीय मंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी मांडले मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  संसद भवनात पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते लालकृष्म अडवाणी उपस्थित होते. मोदी म्हणाले, हा विजय आपल्याला कायम ठेवावा लागेल. त्यासाठी सर्वांना कष्ट केले पाहिजेत. त्रिपुरातील विजय हा तत्त्वांचा विजय असल्याचे मोदींनी सांगितले. त्रिपुरामध्ये २५ वर्षांपासून डाव्या पक्षांचा गड राहिला आहे. त्यामुळेच हा विजय महत्त्वाचा आहे. परंतु हा विजय कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नात सातत्य ठेवण्याची गरज आहे. त्रिपुरा एक छोटे राज्य आहे. राज्यात केवळ दाेन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्रिपुरामधील विजयापूर्वी केरळमध्ये भाजपला केवळ एक विधानसभा जागेवर विजय संपादन करता आला आहे. डाव्यांनी नेहमीच हिंसाचार, तिरस्काराचे राजकारण केले आहे. वास्तविक लोकांनी ही विचारसरणीच नाकारली आहे. हे लक्षात घ्या. खरे तर कम्युनिस्ट विचारांचा जगातून नायनाट होऊ लागला . 


आणखी काय म्हणाले मोदी.. 
- डावे नेहमीच हिंसा आणि द्वेषाचे राजकारण करतात. लोक आता त्यांना सगळीकडे नाकारत आहेत. 
- आता तर जगातून डाव्यांचा नायनाटच होत आहे. भारताचा विचार करता केवळ केरळमध्येच त्यांची सत्ता आहे. 
- त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड खूप महत्त्वाचे आहेत. केंद्र सरकारने त्याठिकाणच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व राज्ये सारखी आहेत. 
- आगामी काळात कर्नाटकात निवडणुका आहेत, त्यासाठी पक्षाला कठोर परीश्रम करावे लागणार आहेत. 


भाजपसाठी चांगले निकाल.. 
- मेघालयमध्ये बाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. पण नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) सह अनेक पक्षांच्या आघाडीतून तेथे सत्ता स्थापन केली जात आहे. 
- त्रिपुरामध्ये भाजपला 35 आणि त्यांच्या सहकारी इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला 8 जागा मिळाल्या आहेत. येथे बिप्लब देब मुख्यमंत्री आणि जिष्णू देबबर्मन डेप्युटी सीएम असतील. 
- नागालँडमध्येही भाजप आघाडीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...