आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • We Had Only One Word Sea, Boat Does Not Believe In Gender, Travel Without Leaving It

आम्हाला एकच शिकवण होती... समुद्र, बोट लिंगभेद मानत नाही, तो सोडूनच प्रवास करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या वर्षी १० सप्टेंबरला भारतीय नौदलाच्या सहा वीर महिला अधिकारी सागरी मार्गाने जगभ्रमंतीला निघाल्या. लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशीच्या नेतृत्वाखाली या चमूने २६ हजार सागरी मैल अंतर कापले. धीर न सोडता कधी १४० किमी वेगाने वारे तर कधी १०-१० मीटर उंच लाटांचा सामना त्यांनी केला. हा प्रवास पूर्ण करून या वीर महिला आज भारतात परतत आहेत.

 

गोव्यातील किनाऱ्यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण त्यांचे स्वागत करतील. २५४ दिवसांच्या या प्रवासादरम्यान भास्कर/दिव्य मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे अनुभव, आव्हाने आणि अनेक पैलू यातून उलगडले. हा पूर्ण संवाद व्हाॅट्सअपवर झाला आहे.

 

धैर्य : मुलगा असो की मुलगी, समुद्र भेदभाव करणार नसल्याची होती माहिती
५५ फुटांच्या बोटीवर स्वार होऊन आम्ही समुद्राच्या लाटांवर प्रवासाला निघालो. बोट किंवा समुद्राला तुम्ही कोण आहात हे माहिती नाही त्यामुळे बोटीवर जाण्याआधी आपण स्त्री किंवा पुरुष आहोत ही भावना बाजूला ठेवा, असा सल्ला प्रशिक्षक कमांडर दिलीप दोंडेे यांनी दिला होता. पूर्ण प्रवासात सर्वांना याचा फायदा झाला.  

 

संकल्प : बोटीचे व्हील सांभाळताना हाताची बोटे व्हायची बधिर...
प्रतिघंटा १४० किलाेमीटर वेगाने हवा चालायची. समुद्रात १० मीटर उंच लाटा उसळत होत्या. बोटीचे संतुलन अनेकदा बिघडत होते. पण आम्ही धीर सोडला नाही. द. आफ्रिकेत केप ऑफ होर्नमध्ये सतत ३ दिवस वादळात फसलो. थंडी खूप होती. बोटीचे व्हील सांभाळताना हाताची बोटे बधिर होत असत. 

 

विश्वास : एकसंघ भावना, कोणी बोट सांभाळली तर कोणी स्वयंपाक केला
बोटीवर सफाई करण्यासह स्वयंपाक, भांडी घासणे आदी कामे करावी लागायची. बोटीवर नियंत्रणही मिळवावे लागत होते. एकसंघ भावनेमुळे सर्वकाही सोपे झाले. एकमेकांवर विश्वास होता. त्यामुळे कोणी काम करायचे तर कोणी बोट सांभाळायचे. ३-३ दिवस न बोलताही एकमेकांच्या गरजा आम्ही ओळखत होतो. 

 

जिद्द : आता लढाईच्या मैदानावरही महिलांना तैनात करण्याची गरज
प्रवासात जेथे थांबा होता अशा प्रत्येक ठिकाणी भारतीय लोक आम्हाला भेटायला आले. आमच्या धैर्याचे कौतुक झाले. स्वत:च्या मुलांना असे कार्य करण्यासाठी पाठवण्याचे आपली हिंमत झाली नसती असे अनेकांनी बोलून दाखवले. परंतु आता महिलांना लढाईच्या मैदानावर तैनात करण्यासाठी वातावरण निर्मितीची गरज आहे.

 

हे आहे विशेष : टाइम झोन बदलल्याने वय कधी एक दिवसाने कमी, कधी जास्त 
दर ७ ते १० दिवसांत आमचा टाइम झोन बदलत होता. बदललेल्या टाइम झोननुसार घड्याळ बदलावे लागायचे. कधी वय एक दिवसाने वाढायचे तर कधी कमी होत असे. यातून एक चांगली शिकवण मिळाली. पाण्यात राहून आमच्या संघाने पाण्याचे महत्त्व जाणले. एकदा तर पाणी संपले होते. पावसाचे पाणी घेऊन त्याला उकळून ते प्यावे लागले. या वातावरणातून बाहेर पडल्यानंतर समुद्राची शांती आम्ही मिस करत आहोत. रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर थांबून आम्ही हसायचो. कधी समुद्राकडे तर कधी ताऱ्यांना न्याहाळत होतो. त्या वातावरणात स्तब्ध राहून आम्ही अबोला पाळत होतो.

 

मोहिमेचा प्रारंभ - 10 सप्टेंबर 2017
एकूण अंतर - 26000 सागरी मैल
परतीचा दिवस - 21 मे 2018 रोजी
किती दिवस - 254 दिवस

 

 

 

बातम्या आणखी आहेत...