आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A 12th Class Student Killed By White Tiger At Delhi Zoo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO - प्राणी संग्रहालयात पाय घसरून पडलेल्या विद्यार्थ्याचा वाघाने बघता बघता घेतला जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: प्राणी संग्रहालयात विद्यार्थ्यासमोर मृत्यूच्या रुपात उभा असलेला वाघ.)

नवी दिल्ली - दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात आज एक अगदी अंगावर काटा उभा करणारी खळबळजनक घटना घडली. प्राणी संग्रहालयातील एका पांढर्‍या वाघाने बारावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांला ठार केले. पाय घसरुन हा विद्यार्थी वाघाच्या पिंजऱ्यात पडला होता. आज दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याचे नाव मकसूद असून हा पिंजर्‍याच्या कठड्यावर चढून वाघाचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान त्याचा तोल सुटला आणि तो वाघाच्या पिंजर्‍यासमोर असलेल्या दरीत पडला. खाली पडल्यानंतर जवळपास 10 मिनिटांपर्यंत वाघाने या युवकावर कोणत्याही प्रकारे हल्ला चढवला नाही. यावेळी मकसूद वाघासमोर हात जोडून बसला होता. मात्र या दरम्यान कोणी तरी दगड मारल्याने वाघ चिडला आणि त्याने मकसूदवर जोरदार हल्ला केला. हल्ल्यानंतर जवळपास 15 मिनिटे वाघ मकसूदला घेऊन इकडे तिकडे ओढत नेत होता.
काही प्रत्यक्षदर्शींनी या संपूर्ण घटनेला आपल्या कॅमेर्‍यात कैद केले. त्यामध्ये वाघाने मकसूदला ओढत नेताना दिसते. इतर लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मकसूद दरीत पडल्यानंतर जवळपास 20 मिनिटांनी सुरक्षारक्षक घटनास्थळी पोहोचला.

या दरम्यान, प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाने एक लेखी बयान जारी केले आहे. प्राणी संग्रहालयाच्या काही सुरक्षा रक्षकांनी वाघाचे लक्ष मकसूदवरून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. प्राणी संग्रहालयात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याने सांगितले की, मकसूदला अनेकवेळा पिंजर्‍याच्या जवळ जाण्यास मनाई केली होती. या दुर्घटनेत संपूर्ण चुकी ही मकसूदचीच असल्याचे प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणानंतर प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, वाघाने कशा प्रकारे हल्ला केला, याचा व्हिडीओ आणि त्यानंतरचे जिवाचा थरकाप उडवणारे फोटो...
व्हिडीओ सौजन्य - रमण संघी