आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांच्या वर्दीत तरुणीचा फोटो व्हायरल, लोक म्हणाले- आता गुन्हेगार स्वत:च सरेंडर करतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल मीडियावर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. याबद्दल युजर्स पोस्ट आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, जर अशा अधिकारी आपल्या पोलिस स्टेशनमध्ये आल्या तर मी 3-4 वेळाही खून करायला तयार आहे. दुसरीकडे, एका फेसबुक युजरने लिहिले की, यांना पाहून सर्व गुन्हेगार स्वत:हूनच सरेंडर करतील. दावा केला जात आहे की, ही महिला पंजाबच्या भटिंडा पोलिसांतील इन्स्पेक्टर हरलीन कौर आहेत. या दाव्यात किती सत्यता आहे वाचा DivyaMarathi.Com वर पूर्ण स्टोरी...


वास्तविक, फेसबुक, ट्विटरसहित व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेला तरुणीचा फोटो पोलिस अधिकारी नाही तर अॅक्ट्रेस कायनात अरोराचा आहे.
- एका टीव्ही चॅनलशी बोलताना कायनातने याबाबत स्वत:च खुलासा केला. याशिवाय आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही पूर्ण सत्य लिहिले आहे.
- अॅक्ट्रेस कायनात सध्या पंजाबात  'जग्गा जेउंदा है' चित्रपटाची शूटिंग करत आहे. यात ती एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे.
- यादरम्यान कुणीतरी पोलिसांच्या वर्दीत तिचा फोटो क्लिक करून सोशल मीडियावर टाकला, जो आता व्हायरल होत आहे.


कोण आहे कायनात?
- 2 डिसेंबर 1986 रोजी कायनातचा  जन्म डेहराडूनमध्ये झाला होता. तिचे निकनेम चारू अरोराही आहे.
- ती पंजाबी आणि पहाडी कुटुंबातून आहे. इंटरनेटवरील माहितीनुसार तिला दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीची कझिनही असल्याचे म्हटले जाते.
- कायनात अरोरा इंडियन मॉडेल आणि अॅक्ट्रेस आहे. तिने 2010 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या "खट्टा मिठा"मधून डेब्यू केले होते.
2013 मध्ये आलेल्या ग्रँड मस्ती चित्रपटातही ती दिसली होती.
- याशिवाय कायनात अरोराने मल्याळी चित्रपट Lailaa O Lailaa, तामिळ चित्रपट Mankatha आणि पंजाबी चित्रपट Faraar मध्येही काम केले आहे.
- 2010 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात करणारी कायनातने आतापर्यंत हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळमसहित पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...