आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-यूपीचा सामना सुरू असताना एका व्यक्तीने खेळपट्टीवरून दोन वेळा नेली कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हे छायाचित्र एअरपोर्ट स्पोर्ट्््स  कॉम्प्लेक्स मैदानाचे आहे. दिल्ली व उत्तर प्रदेश संघांत रणजी लढत सुरू होती. गौतम गंभीर, ईशांत शर्मा, सुरेश रैना आदी  दिग्गज खेळाडू मैदानावर होते. इतक्यात एक जण कार चालवत चक्क खेळपट्टीवर आला. खेळाडूंनी त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला. तरीही त्याने दाेन वेळा खेळपट्टीवरून कार नेली. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवले. त्याने आपले नाव गिरीश शर्मा सांगत आपण भरकटलो होताे, असे सांगितले. येथे रणजी सामना होत असल्याचे त्याला माहीत नव्हते. घटना शुक्रवारी संध्याकाळी ४.४० वाजता घडली.
बातम्या आणखी आहेत...