आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO: या चिमुकल्याला लाथांनी मरेपर्यंत मारतोय हा नराधम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एखादा चिमुकला दिसला, की आपण लगेच त्याचे लाड करतो. त्याला चॉकलेट-बिस्किटे देतो. कारण लहान मुले असतातच तशी. त्यांना बघितल्यावर मनात कधीच राग येत नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या कृत्यावरही मनात संताप उमटत नाही. पण या व्हिडिओतील नराधम या चिमुकल्याला चक्क लाथांनी मारताना दिसतो. तो एवढा मारतो, की चिमुकल्याला रडणेही कठीण होऊन बसते. त्यावरही त्याचे समाधान होत नाही. त्याला खाली जमिनीवर आपटत गळा दाबायचा प्रयत्न करतो. या व्यक्तीला चाईल्ड अब्युज अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ही घटना थायलंडची आहे.
व्हिडिओत काय आहे
2 मिनिट आणि 25 सेकंदांच्या या व्हिडिओत आरोपी पाच वर्षांच्या मुलाला फारच क्रूरतेने मारहाण करताना दिसतो. मुलाकडून होमवर्क करुन घेण्यासाठी हा माणूस त्याला लाथा मारतो. यावेळी तो मुलाला काही प्रश्न विचारतो. चुकीचे उत्तर दिले, की लाथा मारतो. एवढेच नव्हे तर अगदी डोक्यालाही लाथा मारतो. त्याचा गळाही आवळण्याचा प्रयत्न करतो.
बॅंकॉक कोकोनटच्या रिपोर्टनुसार, या मुलाच्या आईने व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडिओ बघून इतर लोकांनी तिची मदत करावी असा तिचा उद्देश होता. फेसबुकवर आतापर्यंत 250,000 वेळा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
आरोपी म्हणाला, मला पश्चाताप आहे
हैतयाई पोलिस ठाण्यात या 30 वर्षीय माणसाला मीडियासमोर सादर करण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, की मी तेव्हा माझा राग कंट्रोल करु शकलो नाही. पण मला माझ्या कृत्याचा पश्चाताप आहे. मला जॉब नसल्याने आणि मी ड्रग्ज घेऊन असल्याने असे कृत्य केले.