आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Sheaf Of Papers With Rahul Gandhi In Parliament Photo Viral On Media

राहुल गांधींनी स्क्रीप्ट पाहुन ठोकले भाषण? सोशल मीडियात PHOTO व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभेत बुधवारी कॉंग्रेसचे युवराज अर्थात उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण उत्स्फूर्त नसून स्क्रिप्टेड असल्याच्या चर्चेला सोशल मीडियात ऊत आला आहे. 'ललिलगेट'प्रकरणी स्वत: वरील आरोपांचे खंडन करताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर घणाघात केला. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिलेले सडेतोड भाषणही तितकेच गाजले होते. राहुल यांच्या भाषणाचे कौतुकही झाले होते.
मात्र, राहुल यांचे भाषण उत्स्फूर्त नसून ते एका कागदावर लिहून आणल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी स्क्रीप्ट वाचून ठोकलेल्या भाषणातून सुषमा स्वराज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाणा साधला. या स्क्रीप्टमधील मुद्दे हिंदी होते. त्याचबरोबर रोमन लिपीत लिहिले होते. राहुल गांधींच्या भाषणाच्या मुद्द्यांचे फोटो अक्षरश: सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राहुल गांधींच्या भाषणातले काही ठळक मुद्दे दिसत होते स्क्रीप्टमध्ये...
* देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकायचे आहे. ललित मोदी, मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याप्रकरणी लोकांना पंतप्रधानांचे मत जाणून घ्यावचे आहे.
* जनतेला मोदींच्या जागेवर 'मौन जी' दिसत आहेत.
* कागदावर खाली 'Monkeys of Gandhiji' असे लिहिले होते.
* लाल शाईत लिहिले होते- बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो!

दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींवर घणाघात करताना महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचे उदाहरण दिले होते.
राहुल यांच्या स्क्रीप्टेड भाषणावरून सोशल मीडियात उमटलेल्या निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे...
@SMedia4:
#TruthHurtsRG Thus spake @arunjaitley "Rahul Gandhi is an expert without knowledge"
@HathwalaThakur:
Proof that Rahul Gandhi writes his own speech

@bwoyblunder
Pic1: Rahul Gandhi past handwriting (cursive)
Pic2: Yday (Capital)
Experts should say if both can come from 1 person.

@shilpitewari:
Rahul Gandhi carries a cheat sheet for even rhetoric... that too in bold capital letters..
@rishibagree
Rahul Gandhi uses CHIT to make Lok Sabha Speech, which has been written by someone else
@AnInflatedBun:
With the chit, Rahul Gandhi has successfully passed the writing test! He is eligible to apply for pre-primary schooling now!!