आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉसचे व्यक्तिमत्त्व सांगणारे सॉफ्टवेअर तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉसचे व्यक्तिमत्त्व नेमकेपणे समजून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर एका सॉफ्टवेअरची मदत घेता येणार आहे. हे सॉफ्टवेअर बॉसच्या व्यक्तिमत्त्वाचे भाकीत करेल.संगणकीय तपशिलाचे विश्लेषण करणारे हे साधन आहे. त्याद्वारे व्यक्तीचा वेध घेतला जाऊ शकतो, असा दावा बिंघम्टन विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अतिशय विश्वसनीय पद्धतीने व्यक्तिमत्त्वाचा वेध घेता येणार आहे.
हे सॉफ्टवेअर व्यक्तीकडून वापरण्यात येणा-या ‘मी’, ‘माझे’, ‘माझ्याकडून’ अशा शब्दांवर भर देते. त्यातून व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आढावा घेता येतो. उत्साह, आत्मविश्वास, ऊर्जा यासारख्या भावना आणि स्थितीचा अंदाज बांधता येतो, असे सहायक प्रोफेसर विल्यम स्पांगलर यांनी सांगितले. त्याचबरोबर संशय, भीती, चिडचिड, चिंता, चुका यांचेही शास्त्रीय पद्धतीने मूल्यमापन करता येते. त्यावरून व्यक्तिमत्त्वाची निर्णयक्षमता, संबंध हाताळण्याचे कौशल्य आणि संस्थात्मक पातळीवर उत्पादकतेचे स्वरूप कसे आहे, याचेही भाकीत करणे शक्य आहे. एकूणच बॉसमंडळींच्या वृत्तीचा अंदाज घेता येईल, असा दावा करण्यात आला आहे.