19 जानेवारी रोजी आचार्य रजनीश यांची पुण्यतिथी होती, त्यानिमीत्ताने divyamarathi.com त्यांच्याबद्दल सांगत आहे
नवी दिल्ली - महात्मा गांधी आणि ओशो यांची दोन वेळा भेट झाली होती. हा प्रसंग त्यांच्या दुसऱ्या भेटीतील आहे. स्वतः रजनीश यांनी याचा उल्लेख केला आहे. तो काळ ब्रिटीश इंडियाचा होता. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरु होती.
ओशो यांच्या आजीने त्यांना तीन रुपये दिले होते. ते घेऊन ओशो स्टेशनवर आले होते.
गांधीजींशी भेट झाल्यावर काय झाले ...
गांधीजींशी भेट झाली तेव्हा ओशो दहा वर्षांचे होते. त्यांना रेल्वे पाहायची होती. ते स्टेशनवर पोहोचले. त्यांच्या खिशात आजीने दिलेले तीन रुपये होते. रेल्वे अर्धातास लेट होती. स्टेशनवरुन सर्व लोक परत गेले होते. पण ओशो तिथेच बसून होते. स्टेशन मास्तरने त्यांना विचारले देखिल, की सर्व लोक निघून गेले तु सकाळपासून वाट पाहात आहेस.
खूप वेळानंतर रेल्वे आली आणि त्यातून गांधीजी उतरले. स्टेशन मास्तरने ओशोंची गांधीजीसोबत भेट करुन दिली. गांधीजींकडे दान पेटी होती. ओशोंच्या खिशात तीन रुपये होते. गांधीजी म्हणाले, हे पैसे देशातील गरीबांसाठी या पेटीत टाक. काही प्रश्नोत्तरांनंतर ओशोंनी पैसे पेटीत टाकले.
पैसे पेटीत टाकल्यानंतर काय घडले
- ओशोंनी त्यांच्याकडील तीन रुपये दानपेटीत टाकल्यानंतर गांधीजींच्या हातून पेटीच हिसकावून घेतली. ते म्हणाले, माझ्या गावात जास्त गरीब लोक आहेत, मी त्यांच्यात हे पैसे वाटून देतो. मात्र नंतर रजनीश यांनी गांधीजींना दानपेटी परत केली आणि म्हणाले - ही तुम्हीच ठेवा. मला वाटते सर्वाधिक गरीब तुम्हीच आहात, दरिद्री नारायण.
पेटी हिसकावल्यानंतर काय म्हणाल्या कस्तुरबा
दरम्यान, गांधीजींसोबत कस्तुरबा गांधीही होत्या. बांनी या सर्व प्रसंगावर विनोदात म्हटले, आज तुम्हाला तुमच्या बरोबरीचा कोणी भेटला आहे. तुम्ही लोकांना धोका देता, आता त्याने पूर्ण पेटीच घेऊन टाकली. बरे झाले. मलाही ते ओझे वागवून-वागवून उबग आला होता.
गांधीजींच्या हत्येनंतर लपून रडले होते ओशो
- ओशो महात्मा गांधींचे मोठे टिकाकार मानले जात होते. असे म्हटले जाते, की महात्मा गांधींच्या हत्येनंतर, त्या दिवशी ओशो लपून रडले होते. ते म्हणाले होते, एक प्रामाणिक व्यक्ती गेला.
स्त्रोत - अहा जिंदगी और इंटरनेट
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ओशोंचे रिअर फोटोज्..