आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंक केल्यास महिन्याला बूक करता येतील 6 ऐवजी 12 ऑनलाईन रेल्वे तिकिटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर कोणाताही प्रवासी माय प्रोफाइल कॅटेगरीमध्ये आधार केवायसीवर क्लिक करून त्यांचे आधार क्रमांक अपडेट करू शकतात. - Divya Marathi
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर कोणाताही प्रवासी माय प्रोफाइल कॅटेगरीमध्ये आधार केवायसीवर क्लिक करून त्यांचे आधार क्रमांक अपडेट करू शकतात.
नवी दिल्ली - रेल्वे तिकिट बूक करताना आधार क्रमांक गरजेचा नसतो. पण याद्वारे आता एक नवीन सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) नुसार, ट्रेनचे ऑनलाईन तिकिट बूक करताना आधार व्हेरीफिकेशन केल्यास महिन्याला रेल्वेची 12 ऑनलाइन तिकिटे बूक करता येणार आहे . ही नवी सुविधा 26 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. सध्या कोणीही आधार नंबर शिवायही 6 ऑनलाइन तिकिट बूक करू शकते. 

1) काय बदल झाला?
- IRCTC ने स्पष्ट केले आहे की, महिन्याला 6 तिकिटांच्या बुकींसाठी आधार व्हेरिफिकेशनची गरज पडत नाही. हा नियम काम राहणार आहे. पण एखाद्या पॅसेंजरने आधार लिंक केले, तर त्याला महिन्याला 12 तिकिट बूक करता येतील. 

2) रेल्वे तिकिटासाठी आधार गरजेचे आहे?
- ऑगस्ट महिन्यामध्ये संसदेमध्ये रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहिन यांनी सांगितले की, रेल्वे तिकिट बूक करण्यासाठी आधार नंबर (UID) गरजेचा नाही. तसेच भविष्यातही तसे काही करण्याचा विचार नाही. 

3 ) कसे होते आधार व्हेरीफिकेशन..?
आयआरसीटीसी पोर्टलवर कोणीही प्रवासी माय प्रोफाइल कॅटेगरीमध्ये आधार केवायसीवर क्लिक करून त्यांचे आधार क्रमांक अपडेट करू शकतात. या व्हेरीफिकेशनदरम्यान आधारशी संलग्न मोबाईल एक वन टाइम पासवर्ड पाठवला जातो. हा पासवर्ड पोर्टलवर अपलोड केल्यास आधार कार्डचे व्हेरीफिकेशन होते. त्याशिवाय ही सुविधा रेल कनेक्ट मोबाइल अॅपवरही आहे. 

4) रेल्वेने का घेतला निर्णय?
- प्रवाशांनी IRCTC अकाऊंटद्वारे ऑनलाइन तिकिट बूक करताना आधार लिंक करावे असा रेल्वेचा प्रयत्न आहे. 
- केंद्र सरकारने अनेक स्कीम्समध्ये आधार अनिवार्य केले आहे. काही दिवसांपूर्वी आयटी मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांनी सांगितले होते की, सध्या एकूण 135 योजना आधारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. तसेच देशभरात 110 कोटींपैकी सुमारे 67 कोटी बँक अकाऊंट आधारबरोबर लिंक केले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...