आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंकला 31 डिसेंबरपर्यंत मुदत; अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांची कोर्टात माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने विविध सरकारी योजनांसाठी आधार क्रमांक देण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंतच होती. याबाबत अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी बुधवारी कोर्टात माहिती दिली. दरम्यान, आधारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर काेर्ट नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करेल. याचिकाकर्त्यांनी लवकर सुनावणीची विनंती केली होती. आधार लिंक मुदतवाढीनंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले की, ‘अाता या प्रकरणात लवकर सुनावणीची गरज उरलेली नाही.’
बातम्या आणखी आहेत...