आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ऑफिसमधील खात्यांना आधार सक्तीचे, 31 डिसेंबरपर्यंत करुन घ्या संलग्नीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्टातील प्रत्येक खात्यांना आधार संलग्नीकरण सक्तीचे. - Divya Marathi
पोस्टातील प्रत्येक खात्यांना आधार संलग्नीकरण सक्तीचे.
नवी दिल्ली - सरकारने बँक खात्यानंतर आता पीपीएफ, राष्ट्रीय बचत पत्र योजना, किसान विकास पत्र आणि पोस्ट ऑफिस ठेव योजनेसाठीही आधार सक्तीचे केले आहे. सध्याच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्याला आधार लिंक करण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर 2017 आहे. 
 
पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन द्यावी लागेल आधारची माहिती 
- पोस्ट ऑफिसमधील खात्यांना आधार लिंक करण्यासाठी पोस्टात जाऊन याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. बँकांप्रमाणे येथे आधार संलग्नीकरण हे ऑनलाइन असणार नाही. त्याचे कारण बहुतेक पोस्ट ऑफिसमध्ये अद्याप ऑनलाइन सुविधा नाहीत. 
- देशात एकूण 1.5 लाख पोस्ट ऑफिस आहेत. पोस्ट ऑफिस खातेदारांना आधार संलग्न करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. तर, बँक खातेदारांना त्यांचे खाते आधारशी जोडण्यासाठी 6 महिन्यांच्या कालावधी मिळाला होता. 
 
पोस्ट खातेदारांची संख्या ग्रामीण भागात जास्त 
- देशाच्या ग्रामीण भागात पोस्ट खात्याचे नेटवर्क मोठे आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिक हे आपला पैसा पोस्टातील खात्यांमध्ये जमा करतात. ही खाती आता आधारशी लिंक करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. यासाठी देण्यात आलेला तीन महिन्यांचा कालावधी कमी असल्याने खातेधारकांना काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 
- याआधी सरकारने बँक खाते उघडण्यासाठी आधार सक्तीचे केले होते. तर, बँक खातेधारकांना त्यांची खाती आधारशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. 
- केंद्र सरकारने बेनामी संपत्ती आणि ब्लॅकमनीवर अंकुश लावण्यासाठी हे पाऊल उचलेल आहे. 
सरकारी कल्याणकारी योजना आणि अनुदान घेणाऱ्यांना आधारमधून दिलासा 
- गेल्या महिन्यात सरकारी कल्याणकारी योजना आणि अनुदान घेण्यासाठी आधार सलंग्नीकरणाची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नाही ते 31 डिसेंबरपर्यंत सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. 
- आधार सलंग्नीकरणाची मुदत वाढवल्यामुळे देशातील 135 योजनांच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...