आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू प्रमाणपत्रासाठी 1 अॉक्टोबरपासून आधार कार्ड आवश्यक, थांबतील फसवणुकीचे प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मृत्यूची नोंदणी करण्यासाठीही आता आधार कार्ड बंधनकारक असेल. मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जात इतर विवरणाबराेबर मृताच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार क्रमांक किंवा आधार कार्ड नोंदणी क्रमांक द्यावा लागेल. सोबतच अर्जदाराला त्याच्या व मृताच्या पती/पत्नी किंवा पालकांचाही आधार क्रमांक द्यावा लागेल. 
 
दाेन महिन्यांनंतर म्हणजे १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे. मृत्यूच्या वेळी जर कुणाजवळ आधार कार्ड नसेल तर नियम शिथिल होतील. अर्जदाराला त्याबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. मात्र ते खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल. सरकारचा दावा आहे की, मृत्यू नोंदणीला आधार लिंक केल्याने ओळखपत्रांबाबतचे फसवणुकीचे प्रकार थांबतील. गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने शुक्रवारी अधिसूचना जारी केली. 
 
भास्कर Q&Aआधार नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास तो गुन्हा ठरवला जाईल
 
आता मरतानाही आधारची काळजी करायची? असे का? 
- सरकारनुसार, या निर्णयाने मृताचे आप्त, आश्रित व परिचितांनी दिलेल्या माहितीची खात्री होईल. मृताच्या ओळखीबाबत गैरप्रकार थांबवण्यास ही पद्धत प्रभावी ठरेल. मृताच्या ओळखीसाठी अनेक कागदपत्रे देण्याची गरज राहणार नाही.

व्यक्ती चालू-फिरू शकत नसेल तर मृत्यूआधी त्याचे आधार बनवायचे का? 
- अशी अट नाही. मृत्यूवेळी आधार नसेल तर नियम शिथिल होतील. मृत्यू प्रमाणपत्राचा अर्ज करणाऱ्याला ‘मृताकडे आधार नव्हते.’ असे लिहून द्यावे लागेल. मात्र, हा दावा खरा असला पाहिजे. खोटे प्रतिज्ञापत्र देणे गुन्हा आहे. आधार कायदा २०१६ आणि जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९ नुसार कारवाई केली जाईल.

मृताचा आधार नंबर दिल्यास भागेल का?
- नाही. जो मृत्यू प्रमाणपत्र काढायला जाईल त्याला स्वत:चाही आधार द्यावा लागेल. मृताच्या पती किंवा पत्नी वा पालकांचाही आधार क्रमांक द्यावा लागेल.

हा निर्णय देशभरासाठी आहे का?
- सध्या फक्त जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयाचे रहिवासी या नियमाच्या कक्षेबाहेर आहत. उर्वरित देशातील सर्व नागरिकांवर हा नियम बंधनकारक आहे. या तिन्ही राज्यांत हा नियम लागू होण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...