आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार विधेयकाला संसदेची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेने बुधवारी आधार विधेयक मंजूर केले. हे वित्त विधेयक असल्याने लोकसभेने मान्यता दिलेले विधेयकच मूळ रूपात मंजूर झाले.

काँग्रेसचे जयराम रमेश यांनी या विधेयकाला सुचवलेल्या दुरुस्त्यांना राज्यसभेने मंजुरी दिली होती. पहिल्यांदाच एखाद्या वित्त विधेयकात दुरुस्त्या सुचवल्या होत्या. राज्यसभेने चार दुरुस्त्या सुचवून ते लोकसभेकडे परत पाठवले होते. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. राज्यसभेने सुचवलेल्या दुरुस्त्या लोकसभेने नामंजूर केल्या आणि विधेयकाला मूळ स्वरूपात ध्वनिमताने मंजुरी दिली.
बातम्या आणखी आहेत...