आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या आॅनलाइन तिकिटासाठी आधार कार्ड होणार सक्तीचे, 31 मार्चनंतर अंमलबजावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रेल्वेखाते लवकरच ई-तिकीट बुकिंग आधार कार्डशी जोडणार आहे. यामुळे आधार कार्डाविना ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही. यामुळे रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये दलालांची घुसखोरी रोखता येईल. रेल्वेच्या बिझनेस प्लॅननमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. 
 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी ही योजना सादर केली. बनावट ओळखपत्रांद्वारे होणारे तिकिटांचे बुकिंग आणि दलालांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात सवलतीसाठी आधार कार्ड क्रमांक सक्तीचे करण्यात आले होते. एप्रिलपासून आधार कार्डाविना ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात सवलत मिळणार नाही. तथापि, ३१ मार्चपर्यंत ही सुविधा केवळ प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात आली आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...