आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadhar Card Not Mandatory For Subsidized LPG Cylinder

विना\'आधार\' मिळणार अनुदानित गॅस सिलिंडर; पेट्रोलियम मंत्री मोईलींची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- घरगुती वापराचा अनुदानित गॅस सिलिंडरसाठी 'आधार कार्ड'ची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने आज (शुक्रवारी) स्पष्ट केले. गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द केल्याचेही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी लोकसभेत सांगितले. सिलिंडर वितरण एजन्सी, आधार कार्ड आणि बॅंक खात्याशी जोडलेला संबंध तोडण्याचे आदेश पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याचेही मोईल यांनी सांगितले.

आता आधार कार्डशी जोडलेल्या खात्याशिवाय ग्राहकांना थेट आपल्या वितरकाकडून अनुदानित सिलिंडर मिळेल. तशा त्यांना लवकरच सुचनाही दिल्या जाणार असल्याचे मोईलींनी सांगितले. अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याबद्दल बॅंकांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे सरकारने डायरेक्ट कॅश ट्रान्सफर (डीसीटी) योजना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे मोईलींनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

डीबीटीमध्ये तांत्रिक अडचणी
मोइली म्हणाले, डायरेक्ट बॅंक कॅश ट्रान्सफर (डीबीटी) योजनेत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. विशेष म्हणजे या समस्या बॅंकेशी संबंधित होत्या. डीबीटीनुसार, ग्राहकांच्या बँक खात्यावर प्रति सिलिंडर 435 रूपये अनुदान जमा केले जात होते. डीबीटीनुसार आतापर्यंत देशात 4.86 कोटी अकाउंट तयार करण्‍यात आले आहेत. अनुदानीत गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नसल्याचेही मोईली यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, 2.06 कोटी कुटुंबियांना अनुदानित सिलिंडर मिळत असल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. घरगुती गॅस कनेक्शनसाठी केवाईसी नियमाबाबत मोइलींनी सां‍गितले, की मल्टीपल कनेक्शनबाबत आवशक्यतेनुसार विचार केला जाईल. एकाच पत्त्यावर दोन गॅस कनेक्शन असतील तर संबंधित घरात स्वयंपाक घर मात्र वेगवेगळे असणे आवश्यक आहे, याबाबत ग्राहकाने प्रतिज्ञापत्र देणेही बंधनकारक आहे.