आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadhar Not Mandatory For Subsidized LPG Cylinder

अनुदानित सिलिंडरसाठी आता ‘आधार’ची गरज नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनुदानित गॅस सिलिंडरसाठी आधार कार्डाची गरज नाही. पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी लोकसभेत शुक्रवारी ही माहिती दिली. त्यामुळे ज्यांनी आधार क्रमांक गॅस कनेक्शन व बँक खात्याशी जोडलेला नाही, त्यांनाही अनुदानित सिलिंडर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासंबंधीचा आदेश याच आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे मोईली म्हणाले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काही खासदारांनी याबद्दल तक्रारी केल्या. अनेक गॅस एजन्सींनी अजूनही आधार क्रमांकासाठी ग्राहकांवर दबाव आणला असल्याचे या खासदारांचे म्हणणे होते. यावर स्पष्टीकरण देताना मोईली यांनी यासंबंधी माहिती दिली.
आधार क्रमांक गॅस आणि बँक खात्याशी जोडण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात 4.86 कोटी खाती जोडण्यात आली असल्याची माहिती मोईलींनी दिली.
291 जिल्ह्यांतील 2.06 कोटी कुटुंबांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 57 कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. मात्र, यात व्यावहारिक अडचणी येत असल्याचे ते म्हणाले. घरगुती वापरासाठी असलेल्या सिलिंडरवर मुळात 700 रुपये अनुदान आहे. मात्र, प्रत्यक्षात बँक खात्यावर 400 रुपयांचीच रक्कम जमा होत होती. यावर खासदारांचा आक्षेप होता.

पुढील स्लाइडमध्ये, निलेकणी राजीनामा देणार