आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadami Party News In Marathi, Ashok Kumar, Divya Marathi

तिकिटासाठी पैसे मागणा-या दोन नेत्यांची ‘आप’मधून हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आम आदमी पार्टीने शुक्रवारी दोन नेत्यांची हकालपट्टी केली. त्यांच्यावर तिकिटासाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे. अवध झोनच्या अरुणा सिंह व हरदोईच्या अशोककुमार यांचा हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी पक्षाची स्थापना केली आहे. परंतु जिल्हा पातळीवर काही लोक पैसे घेऊन तिकीट देत आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना निलंबित केल्याचे पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केले. जर तुमच्याकडे तिकिटाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आली तर त्यांना पैसे देऊ नका. परंतु अशी कृती कोणी करत असेल, तर त्याचे स्टिंग ऑपरेशन करून आम्हाला पाठवा. आम्ही त्यांना 24 तासांच्या आत पक्षातून बाहेर काढू, असे त्यांनी स्पष्ट केले.


आपची नववी यादी
आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची नववी यादी जाहीर केली आहे. आता पक्षाने 317 उमेदवारांना निवडणुकीत उतरवले आहे. यादीत कर्नाटकचे 15, गुजरात, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालचे प्रत्येकी तीन, आसाम आणि महाराष्ट्राचे प्रत्येकी दोन तर केरळ, ओडिशाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.