नवी दिल्ली - दिल्लीची सत्ता सोडलेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद
केजरीवाल यांनी पुन्हा एकदा निवडणुकांशिवाय दिल्लीची गादी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांचा पक्ष काँग्रेसबरोबर पडद्यामागे चर्चा करत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हा दावा केला आहे. या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या अनेक आमदारांनी आम आदमी पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली होती. या आमदारांनी आपल्या पक्षावर म्हणजेच काँग्रेसवर आपला पाठिंबा देण्यासाठी दबाव निर्माण करावा असे या नेत्याने काँग्रेसच्या नेत्यांना सांगितल्याचे वृत्त आहे.